संजय कपूरच्या निधनानंतर, करीनाने बहीण करिश्मासाठी लिहिला खास संदेश, म्हणाली ‘हा कठीण काळ जास्त…’
25 जून रोजी तिचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिला चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिच्या वाढदिवसानिमित्त करीनाने खास पोस्टही केली आहे. या पोस्टमध्ये तिने करिश्माबद्दल आणि यावर्षी झालेल्या कठीण प्रसंगांचा उल्लेख केला.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आज म्हणजेच 25 जून रोजी तिचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिचे सर्व चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. करीना कपूरनेही तिच्या मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि सोशल मीडियावर तिच्या नावाने एक पोस्टही लिहिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच करिश्माचा एक्स पती संजय कपूरचं निधन झालं. हा नक्कच सर्वांसाठी धक्का होता. त्यामुळे बहिणीचे मनोबल वाढवण्यासाठी करीनाने एक खास पोस्ट लिहिली आहे.
करिनाने करिश्मासाठी काय लिहिले? करिनाने करिश्मा आणि सैफचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना करिनाने लिहिले की, “तुम्हा दोघांचाही हा माझा आवडता फोटो आहे. या विश्वातील सर्वात बलवान आणि सर्वोत्तम मुलीसाठी. हे वर्ष आमच्यासाठी कठीण होते, पण तुम्हाला माहिती आहे काय. असे म्हणतात की कठीण काळ जास्त काळ टिकत नाही, पण बहिणी जास्त काळ टिकतात.”असं म्हणत करीनाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे वर्ष कठीण गेल्याची करीनाला खंत
दरम्यान या वर्षी जानेवारीमध्ये सैफ अली खानवर त्याच्या घरात चाकूने हल्ला करण्यात आला होता. चोरीच्या उद्देशाने एका व्यक्तीने त्याच्या घरात घुसून सैफला जखमी केले होते. या गोष्टी आठवत करिना हे वर्ष त्यांच्यासाठी कठीण गेल्याचं म्हटलं आहे.
View this post on Instagram
“माझ्या बहिण, आईला अन् मैत्रिणीला…”
करीनाने पुढे लिहिले, “माझ्या बहिण, आईला अन् मैत्रिणीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा लोलो.” करीना आणि करिश्मा, दोन्ही बहिणी एकमेकांच्या खूप जवळ आहेत. दोघांनीही त्यांच्या उत्तम अभिनयाने बॉलिवूडच्या जगात खूप नाव कमावले आहे. करिश्मा गेल्या 34 वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करत आहे. तिचा पहिला चित्रपट ‘प्रेम कैदी’ होता जो1991 मध्ये आला होता. दुसरीकडे, करीना गेल्या 25 वर्षांपासून इंडस्ट्रीचा भाग आहे. तिने 2000 मध्ये ‘रिफ्यूजी’ नावाच्या चित्रपटाने तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
या स्टार्सनीही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
करीनाच्या या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. लोक कमेंट करून करिश्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याशीवाय भूमी पेडणेकर, आयुष्मान खुराना, मलायका अरोरा, सैफची बहीण सबा अली खान, कनिका कपूर यांसारख्या अनेक स्टार्सनीही कमेंट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
