‘जन्मानंतर वडिलांनी माझं तोंडही पाहिलं नाही…’, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा; सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

मुंबई : छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री करिश्मा तन्ना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीच्या जन्मानंतर कित्येक दिवस वडिलांनी करिश्माचं तोंड देखील पाहिला नव्हतं. जेव्हा करिश्मा मोठी झाली, तेव्हा तिच्या आईने बालपणात घडलेल्या गोष्टींबद्दल करिश्माला सर्वकाही सांगितलं. करिश्मा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री गुजराती आहे.
अभिनेत्री म्हणाली ‘माझा जन्म झाल्यानंतर वडिलांनी माझ्याकडे पाहिलं देखील नाही. त्यामुळे मोठं झाल्यानंतर मला असं काही करायचं होतं ज्यामुळे वडिलांना माझा गर्व वाटेल..’ सध्या सर्वत्र करिश्मा तन्ना हिची चर्चा रंगत आहे..
करिश्माने वयाच्या 17 व्या वर्षी एकता कपूर हिची ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मालिकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही.. तिने ‘संजू’ सिनेमात देखील भूमिका बजावली.. करिश्मा वेब सीरिजच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस आहे…

सास भी कभी बहू थी, नागिन आणि कयामत की रात यांसारख्या टीव्ही शोमध्ये करिश्मा तन्नाने घराघरातील प्रेक्षकांची छाप पाडली. ‘खतरों के खिलाडी 10’ची विजेती अभिनेत्री करिश्मा हिने गेल्या वर्षा मोठ्या थाटात बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत लग्नबंधनात अडकली..
करिश्मा आणि वरुण एका ओळखीच्या मित्राच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि मग प्रेम. त्यांनी 12 नोव्हेंबर 2021 ला एंगेजमेंट केली आणि 5 फेब्रुवारी 2021 मध्ये दोघांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं.
वरूण हा मुंबईत राहतो. तो एक बिझनेसमन आहे. करिश्मा तन्नासोबत एंगेजमेंट केल्यापासून तो चर्चेत आला. वरुण व्हीबी ग्रुपमध्ये काम करत असल्याची माहिती आहे. वरुण सोशल मीडियापासून दूर राहणं पसंत करतो. त्यामुळे तो सोशल मीडिया जास्त अॅक्टिव्ह नसतो. त्याने त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंटही प्रायव्हेट ठेवलं आहे.
पण करिश्मा तन्ना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सध्या सर्वत्र करिश्मा आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे.
