AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करिश्मा कपूरला पाहून ऐश्वर्याने बदलला मार्ग; अंबानींच्या पार्टीतील व्हिडीओने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूर एकमेकांच्या खास मैत्रिणी होत्या. या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. मात्र अभिषेकशी ऐश्वर्याचं लग्न झाल्यानंतर करिश्माने तिच्यापासून लांबच राहणं पसंत केलं.

करिश्मा कपूरला पाहून ऐश्वर्याने बदलला मार्ग; अंबानींच्या पार्टीतील व्हिडीओने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
Karisma and AishwaryaImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 06, 2023 | 6:41 PM
Share

मुंबई : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पहायला मिळाली. या कार्यक्रमात सेलिब्रिटींचा जितका झगमगाट होता, तितकेच किस्सेही नंतर चर्चेत आले आहेत. यात असेही काही प्रसंग आले, जेव्हा कधीच एकमेकांशी न बोलणाऱ्या सेलिब्रिटींना एकमेकांचा सामना करावा लागला. तर काहींनी दुरूनच मार्ग बदलले. या यादीत सलमान खान – ऐश्वर्या राय बच्चन आणि ऐश्वर्या – करिश्मा कपूर यांचा सहभाग होता. आता अंबानींच्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये करिश्माला पाहून ऐश्वर्याने दुरूनच आपला मार्ग बदलल्याचं पहायला मिळत आहे.

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेताच्या लग्नादरम्यान अभिषेक आणि करिश्मा यांच्यातील जवळीक वाढली होती. हे दोघं एकमेकांना पसंत करू लागले होते. या दोघांच्या नात्याला बच्चन आणि कपूर कुटुंबीयांचीही मान्यता मिळाली होती. इतकंच नव्हे तर 2002 मध्ये अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडाही झाला होता, असं म्हटलं जातं. मात्र जया बच्चन यांच्यामुळे नंतर दोघांचा साखरपुडा मोडला. त्यानंतर बच्चन आणि कपूर कुटुंबीयांच्या नात्यात कटुता आली होती.

एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूर एकमेकांच्या खास मैत्रिणी होत्या. या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. मात्र अभिषेकशी ऐश्वर्याचं लग्न झाल्यानंतर करिश्माने तिच्यापासून लांबच राहणं पसंत केलं. त्यानंतर अनेकदा दोघी कार्यक्रमांमध्ये एकमेकींकडे दुर्लक्ष करतानाच दिसल्या होत्या.

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by TAHIR JASUS007 (@tahirjasus)

करिश्मा आधी अभिनेता अजय देवगणलाही डेट करत होती, असं म्हटलं जातं. 1992 मध्ये या दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. मात्र 1995 मध्ये दोघांचे मार्ग वेगळे झाले. नंतर अभिषेक बच्चनशी साखरपुडा मोडल्यानंतर करिश्माने 2003 मध्ये संजय कपूरशी लग्न केलं. या दोघांना दोन मुलं आहेत. मात्र 2014 मध्ये करिश्मा आणि संजयने घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान करिश्माने संजयच्या कुटुंबीयांवर बरेच आरोप केले होते.

करिश्माच्या घटस्फोटानंतर ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिचे वडील रणधीर कपूर म्हणाले होते, “आम्ही कपूर आहोत आणि आम्हाला कोणच्याच पैशांमागे धावायची गरज नाही. आमच्याकडे पैसा आणि प्रतिभा या दोन्ही गोष्टी आहेत. संजय हा थर्ड क्लास व्यक्ती आहे. करिश्माचं त्याच्याशी लग्न व्हावं अशी माझी कधीच इच्छा नव्हती. त्याने त्याच्या पत्नीची कधीच काळजी घेतली नाही. तो दुसऱ्या महिलेसोबत राहत होता. तो कसा आहे हे संपूर्ण दिल्लीला माहित आहे.”

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.