Sunjay Kapoor Death : करिश्माचा पूर्व पती संजयच्या अंत्यसंस्काराला विलंब का ? समोर आलं मोठं कारण
Sunjay Kapur Death : अभिनेत्री करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूर याचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पोलो खेळत असतानाच हार्ट अटॅक येऊन तो खाली कोसळला. त्याच्या अकस्मात निधनामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान संजयच्या अंत्यसंस्काराला विलंब होऊ शकतो. त्याचं मोठं कारण समोर आलं आहे.

Sunjay Kapur Death : बॉलिवूडची नामवंत अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि प्रसिद्ध उद्योजक संजय कपूर याचे गुरूवारी वयाच्या 53 व्या वर्षी लंडनमध्ये निधन झालं. मधमाशी गिळल्याने घशात डंख बसला आणि हार्ट अटॅक येऊन तो खाली कोसळला. उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण त्यापूर्वीच मृत्यू झाला. त्याच्या अकस्मात निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला असून सगळेच शोकविव्हल आहेत. मात्र सध्याची सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे,संजयच्या अंत्यसंस्काराल विलंब होऊ शकतो. त्याचं कारण जाणून घेऊया..
संजय होता अमेरिकन नागरिक ?
यूकेमध्ये मृत्यू झालेल्या संजय कपूरचे पार्थिव भारतात आणण्यास विलंब होऊ शकतं. त्याचं कारणंही समोर आलं आहे. एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, संजय कपूर हा अमेरिकन नागरीक होता. मात्र त्याचा मृत्यू हा लंडनमध्ये झाला. त्यामुळे त्याचे पार्थिव हे भारतात आणण्याच्या कायदेशीर प्रक्रियेत समस्या येऊ शकते. त्यामुळे त्याच्या अंत्यसंस्कारसही विलंब होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. गुरूवारी 12 जून रोजी त्याचं निधन झालं, शनिवार रविवारच्या सुट्टीमुळे कागकागदपत्रांच्या कामात आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.
सोमवारपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही, असे कुटुंबीयांचे मत आहे. काही काळापूर्वीच संजयचे शवविच्छेदन केले गेले, जे आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग आहे. संजयचा चुलत भाऊ, जो त्यावेळी बँकॉकमध्ये सुट्टीवर होता, तो संजयचा मृतदेह भारतात आणण्यासाठी त्याचा प्रवास कमी करून लंडनला पोहोचण्याची तयारी करत आहे असेही सांगितलं जात आहे.
दिल्लीत होणार अंत्यसंस्कार
संजयच्या पार्थिवावर भारातत, दिल्लीत अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी त्याचे कुटुंब सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु कायदेशीर अडचणी कायम राहिल्यास, अंतिम संस्कार यूकेमध्येच होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, संजयचे सासरे, प्रिया सचदेवचे वडील यांनी यासंदर्भात माहिती दिली. ‘ सध्या पोस्टमॉर्टम सुरू आहे आणि कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर, त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी भारतात आणला जाईल ‘ असे ते म्हणाले.
मात्र या प्रक्रियेला बराच वेळ लागू शकतो, असं दिसतंय. सध्या कपूर कुटुंब परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि भविष्यातील रणनीतीबाबत उद्यापर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही सूत्रांनी सांगितलं.
कसा झाला संजयचा मृत्यू ?
रिपोर्टनुसार, संजयच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळत असताना त्याला गुदमरल्यासारखे वाटू लागलं. त्याने लगेच खेळ थांबवण्याची विनंती केली आणि नंतर मैदान सोडले. यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि दुर्दैवी निधन झाले. मात्र संजय कपूरने मधमाशी गिळली होती आणि ती त्याच्या घशात चावल्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला होता, असेही काही सूत्रांनी सांगितलं. संजय हार ऑरियस नावाचा पोलो संघ चालवत असे. तो जैसल सिंग नावाच्या हॉटेल व्यावसायिकाच्या सुजान संघाविरुद्ध खेळत होता.
