AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपूर कुटुंबातील सर्वात ‘कंजूस’ अभिनेता कोण? करिश्मा कपूर कडून पोलखोल…

बॉलिवूडचं सर्वात श्रीमंत कुटुंबातील सर्वात कंजूस व्यक्ती... कपूर कुटुंबात कोण आहे सर्वात जास्त कंजूस... अभिनेत्री करिश्मा कपूर हिने केली मोठी पोलखोल...

कपूर कुटुंबातील सर्वात 'कंजूस' अभिनेता कोण? करिश्मा कपूर कडून पोलखोल...
अभिनेत्री करिश्मा कपूर
| Updated on: Jun 09, 2026 | 1:02 PM
Share

कपूर कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून कपूर कुटुंब बॉलिवूडवर राज्य करत आहे. अनेक दिग्गज सेलिब्रिटी देखील कपूर कुटुंबियांनी बॉलिवूडला दिले आहे. सांगायचं झालं तर, कपूर कुटुंबातील काही सेलिब्रिटी असे देखील आहे, जे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील कपूर कुटुंबातील अशी व्यक्ती चर्चेत आली आहे, जी प्रचंड कंजूस आहे. त्या व्यक्तीबद्दल अभिनेत्री करिश्मा कपूर हिने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कपूर कुटुंबातील सर्वात कंजूस व्यक्तीची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, अभिनेत्री करिश्मा कपूर नुकताच विनोदवीर कपिल शर्मा याच्या शोमध्ये वडील रणधीर कपूर यांच्यासोबत आली होती, तेव्हा कपिलने ‘कपूर कुटुंबातील सर्वात कंजूस व्यक्ती कोण आहे?’ असा प्रश्न विचारला. यावर करिश्मा तिच्या वडिलांकडे बोट करत म्हणाली, ‘पैसे खर्च करण्याच्या बाबतीत ते अत्यंत सावध असतात. ते खर्च खूप विचार करुन करतात, गरज नसताना कोणत्या वस्तूवर पैसे खर्च करायला त्यांना आवडत नाही.’

करिश्मा कपूर हिचं असं वक्तव्य ऐकून रणधीर कपूर म्हणाले, ‘माझे विचार ‘व्हॅल्यू फॉर मनी’ पर्यंत मर्यादित आहेत. मला असं वाटतं की, आपण पैसे तेव्हाच खर्च केले पाहिजे, जेव्हा आपल्याला गरज असेल…’, पुढे रणधीर कपूर यांच्याबद्दल एक मजेदार किस्सा करिश्मा हिने सांगितला.

करिश्मा म्हणाली, ‘आम्ही सगळे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी लंडनमध्ये जायचो… जायचं म्हणून सगळे शॉपिंगमध्ये व्यस्त असायचे. नवीन कपडे, बूट आणि दुसऱ्या वस्तू खरेदी करण्यामध्ये आम्ही व्यस्त असायचो… पण माझ्या वडिलांचा अंदाज फार वेगळा होता…’

‘मी जेव्हा त्यांना विचारायची काय नवीन घेतलं आहे. तेव्हा ते म्हणायचे, मी दोन जोडी मोजे खरेदी केले आहेत. अशात मी अनेकदा त्यांना शॉपिंगसाठी पुन्हा पाठवायचे. पण ते काहीच घेऊन यायचे नाहीत. ते फक्त दोन जोडी मोजे आणि दोन जोडी रुमालांची खरेदी करायचे…’ असं देखील करिश्मा म्हणालेली. यावर स्पष्टीकरण देत रणधीर कपूर म्हणाले, ‘एका पुरुषाला आणखी लागतं तरी काय? काही जोड मोजे, काही रुमाल, टाय, दोन – चार शर्ट आणि एक – दोन पँट…’, असं रणधीर कपूर म्हणालेले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा