करिश्मा कपूरला नवऱ्याकडून पोटगी म्हणून मिळतात इतके रुपये, संजय अभिनेत्रीला म्हणाला, ‘लालची औरत…’

Karisma Kapoor Alimony: करिश्मा कपूरला 'लालची औरत' म्हणत संजय कपूरने घेतला विभक्त होण्याचा निर्णय, आजही अभिनेत्रीला पहिल्या नवऱ्याकडून मिळतात इतके पैसे? संजय कपूरची संपत्ती जाणून व्हाल थक्क

करिश्मा कपूरला नवऱ्याकडून पोटगी म्हणून मिळतात इतके रुपये, संजय अभिनेत्रीला म्हणाला, 'लालची औरत...'
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 12:20 PM

Karisma Kapoor Alimony: एक काळ असा होता जेव्हा करिश्मा कपूर हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. करिश्मा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पहिल्या घटस्फोटानंतर अभिनेत्रीने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. करिश्मा ‘सिंगल मदर’ म्हणून दोन मुलांचा सांभाळ करत आहे. करिश्मा कपूर प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचली. पण अभिनेत्रीला खासगी आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना करावा लागला…

करिश्मा कपूर हिने 2003 मध्ये उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 13 वर्षानंतर करिश्मा – संजय यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटा दरम्यान करिश्माने पतीवर अनेक गंभीर आरोप केले…

संजय कपूरवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप होता

करिश्मा कपूरने पती संजय कपूर आणि त्याच्या कुटुंबियांवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, संजयने देखील कोर्टात करिश्मावर अनेक आरोप केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजयच्या वकिलांनी कोर्टात सांगितले होतं की, करिश्माने केवळ पैशांसाठी लग्न केलं आणि ती लालची बाई आहे… अशी वकिलांनी संजयच्या वतीने बाजू मांडली होती.

दोन मुलांची जबाबदारी संजय कपूर याच्यावर

करिश्मा कपूरला मुलगी समायरा आणि मुलगा कियान ही दोन मुले आहेत. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर दोन्ही मुले आईसोबत राहतात. मात्र, दोन्ही मुलांचा खर्च वडील संजय कपूरच्या खांद्यावर आहे. संजय अनेकदा मुलांना भेटण्यासाठी देखील येत असतो.

घटस्फोटानंतर करिश्माला मिळालेली पोटगी…

घटस्फोटानंतर संजय कपूरने करिश्मा आणि त्यांच्या दोन मुलांच्या नावावर 14 कोटी रुपयांचे बाँड खरेदी केले होते. याशिवाय करिश्मा कपूरला संजयच्या वडिलांचे घरही देण्यात आलं. एवढंच नाही तर, आजपर्यंत संजय कपूर प्रत्येक महिन्याला करिश्माला 10 लाख रुपये देतो… संजय मुलांच्या शिक्षणाचा देखील खर्च देतो…

संजय कपूर याची संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय कपूर सोना BLW प्रेसिजनचा चेअरमन आहे. संजय कपूर याच्याकडे जवळपास 120 कोटींची संपत्ती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करिश्मा कपूरला घटस्फोट दिल्यानंतर वर्षभरातच संजय कपूरने प्रिया सचदेवसोबत हिच्यासोबत तिसरं लग्न केलं.

'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....
'जयंत पाटील कपटी, मला हरवण्यासाठी खूप प्रयत्न...', पडळकरांचा निशाणा
'जयंत पाटील कपटी, मला हरवण्यासाठी खूप प्रयत्न...', पडळकरांचा निशाणा.
'...औकात दाखवली', मोदींचा हल्लाबोल, 'इंडिया आघाडी' चं पुढं काय होणार?
'...औकात दाखवली', मोदींचा हल्लाबोल, 'इंडिया आघाडी' चं पुढं काय होणार?.
'त्यांनी गप्पा हाणाव्यात का?' राज ठाकरेंच्या त्या टीकेवर दादांच उत्तर
'त्यांनी गप्पा हाणाव्यात का?' राज ठाकरेंच्या त्या टीकेवर दादांच उत्तर.
'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप
'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप.
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा.