AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेत्यावर महिलेकडून गंभीर आरोप; म्हणाली “तो मला रुममध्ये बंद करून..”

सेझानवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत आयेशा म्हणाली, "होय, मी केलेले आरोप खरे आहेत आणि माझी मुलं त्याचे साक्षीदार आहेत. तो मला माझ्या रुममध्ये बंद करायचा आणि इतर मुलींसोबत स्काइपवरून फ्लर्ट करायचा."

'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्यावर महिलेकडून गंभीर आरोप; म्हणाली तो मला रुममध्ये बंद करून..
Cezanne KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 20, 2023 | 8:54 AM
Share

मुंबई : एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत अनुराग बासूची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता सेझान खानवर एका महिलेनं गंभीर आरोप केले आहेत. आयेशा पिरानी नावाच्या महिलेनं सेझानवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर आयेशाने स्वत:ला सेझानची पत्नी असल्याचाही दावा केला आहे. “सेझानने माझ्यावर खूप अत्याचार केला आहे. तो मला रुममध्ये बंद करून ठेवायचा”, असे आरोप तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केले आहेत. मुस्लीम कायद्यानुसार आम्ही अजूनही विवाहित आहोत, असंही तिने म्हटलंय.

सेझानविरोधात आयेशाने दाखल केली FIR

अमेरिकेत राहणाऱ्या आयेशाने 7 जून रोजी सेझानविरोधात एफआयआर दाखल केली. “सेझान आणि त्याची गर्लफ्रेंड मला अश्लील व्हॉईस नोट्स पाठवायचे आणि मला त्रास द्यायचे,” असाही आरोप तिने केला आहे. हे व्हॉईस नोट्स पोलिसांकडे सोपविल्याची माहिती तिने दिली. गेल्या वर्षी सेझानने त्याची गर्लफ्रेंड अफशीनशी लग्न करणार असल्याचा खुलासा एका मुलाखतीत केला होता. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

सेझानकडून कौटुंबिक हिंसाचार

सेझानवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत आयेशा म्हणाली, “होय, मी केलेले आरोप खरे आहेत आणि माझी मुलं त्याचे साक्षीदार आहेत. तो मला माझ्या रुममध्ये बंद करायचा आणि इतर मुलींसोबत स्काइपवरून फ्लर्ट करायचा. तो कॅसानोव्हा आहे. तो मला नेहमी असं म्हणायचा की, मी तुझ्याशी लग्न केलंय पण माझं आयुष्य तुझ्या स्वाधीन केलं नाही. हा त्याचा नेहमीचा डायलॉग असायचा. त्याने अनेकदा मला शिवीगाळ केली.”

एफआयर दाखल करण्यासाठी भारतात आल्यानंतर ती सेझान आणि त्याची गर्लफ्रेंड अफशीनला भेटली का असा प्रश्न विचारला असता ती पुढे म्हणाली, “नाही, यावेळी मी भेटले नाही. पण गेल्या वर्षी मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. माझ्या भाचीसोबत मी त्याच्या यारी रोडवरील घरी भेटायला गेले होते. पण मला बघताच त्याने पळ काढला. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकलं नाही. मुस्लीम कायद्यानुसार, माझा त्याच्याशी निकाह झाला आहे. आता त्याने अफशीनशी लग्न केल्याचं मला कळतंय. त्यात कितपत खरं आहे मला माहीत नाही. जेव्हा मी त्याला भेटायले गेले होते, तेव्हा मी तिलासुद्धा पाहिलं होतं.”

2021 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सेझानने आयेशाशी लग्न केल्याच्या वृत्तांना फेटाळलं होतं. “ती एक वेडी चाहती आहे”, असं तो म्हणाला होता. “मी कधीच तिच्याशी लग्न केलं नाही. ती एक वेडी चाहती आहे. अशा लोकांबद्दल बोलण्यातही काही तथ्य नाही. ती हे सर्व प्रसिद्धीसाठी करतेय. माझ्या चुलत भावाच्या पत्नीची ती बहीण आहे. मला तिच्याबद्दल इतकंच माहीत आहे. तिने लग्नाची कागदपत्रंसुद्धा मॉर्फ केली आहेत”, असा आरोप सेझानने केला होता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.