AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adipurush | परदेशात ‘आदिपुरुष’मुळे सर्वच हिंदी चित्रपटांना मोठा फटका; सीतेबद्दलच्या ‘त्या’ डायलॉगमुळे थेट बंदी

रामायणावर आधारित आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सैफ अली खानने लंकेश आणि सनी सिंहने शेषची (लक्ष्मण) भूमिका साकारली आहे. एकीकडे नेपाळमध्ये सीतेबद्दलच्या संवादावरून वाद सुरू असताना भारतातही या चित्रपटाला जोरदार विरोध केला जातोय.

Adipurush | परदेशात 'आदिपुरुष'मुळे सर्वच हिंदी चित्रपटांना मोठा फटका; सीतेबद्दलच्या 'त्या' डायलॉगमुळे थेट बंदी
Adipurush
| Updated on: Jun 19, 2023 | 8:25 AM
Share

काठमांडू : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मोठा वाद सुरू आहे. आजपासून (19 जून) काठमांडूमध्ये सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी लागू करण्यात आली आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात सीतेचा उल्लेख ‘भारत की बेटी’ म्हणून केल्याने हा वाद सुरू झाला आहे. काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांनी काठमांडू महानगर क्षेत्रातील सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्याला पाठिंबा दिला आहे. ‘आदिपुरुष’मधील तो संवाद न काढता चित्रपट प्रदर्शित केल्यास कधीच भरून न निघणारं नुकसान होईल, असं ते म्हणाले. ‘जानकी भारत की बेटी है’ हा संवाद अद्याप चित्रपटात तसाच असल्यामुळे आजपासून काठमांडूमध्ये सर्व हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.

तीन दिवसांपूर्वी दिली होती नोटीस

“आम्ही तीन दिवसांपूर्वीच याबद्दलची नोटीस पाठवली होती. चित्रपटातील सीतेबद्दलचा आक्षेपार्ह संवाद काढून टाकण्यासाठी आम्ही तीन दिवस दिले होते”, असं शाह म्हणाले. जर तो संवाद न काढता चित्रपट तसाच प्रदर्शित करण्याची परवानगी दिली तर ती तथ्यांशी छेडछाड होईल, अशीही बाजू त्यांनी मांडली.

काठमांडूमध्ये हिंदी चित्रपटांवर बंदी

काठमांडूमधील 17 थिएटर्समध्ये सध्या प्रदर्शित होत असलेल्या सर्व हिंदी चित्रपटांचं प्रदर्शन थांबवण्याचे आदेश शाह यांनी दिले आहेत. “केएमसीने जारी केलेल्या सूचनेनुसार सोमवारपासून काठमांडूमधील सर्व थिएटरमध्ये भारतीय चित्रपट दाखवणं बंद करतील”, असं केएमसीचे प्रवक्ते नवीन मानंधर यांनी सांगितलं. “आम्ही काठमांडूमधील थिएटरमालकांशी सहकार्यासाठी आधीच बोललो आहोत आणि त्यांनी स्वेच्छेने सोमवारपासून काठमांडूमध्ये हिंदी चित्रपटांचं प्रदर्शन थांबवण्यास सहमती दर्शविली आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आजपासून या थिएटर्समध्ये हिंदीऐवजी नेपाळी चित्रपट दाखवले जातील.

रामायणावर आधारित आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सैफ अली खानने लंकेश आणि सनी सिंहने शेषची (लक्ष्मण) भूमिका साकारली आहे. एकीकडे नेपाळमध्ये सीतेबद्दलच्या संवादावरून वाद सुरू असताना भारतातही या चित्रपटाला जोरदार विरोध केला जातोय. चित्रपटातील डायलॉग्सवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. अखेर निर्माते-दिग्दर्शकांनी हे आक्षेपार्ह डायलॉग्स बदलणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपटाची कमाई

पहिल्या दिवशी आदिपुरुष या चित्रपटाचा जगभरातील कमाईचा आकडा तब्बल 140 कोटी रुपये इतके होता. तर दुसऱ्या दिवशी 65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ही सर्व भाषांमधील कमाई आहे. केवळ हिंदी भाषेतील आदिपुरुषची कमाई ही गेल्या दोन दिवसांत जवळपास 37 कोटी रुपये इतकी झाली. तर तेलुगू भाषेत दुसऱ्या दिवशी 26 कोटी रुपयांची कमाई झाली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.