
Katrina Kaif Pregnancy : अभिनेत्री दीपिका पादुकोण, आलिया भट्ट बी – टाउनच्या या अभिनेत्री आई झाल्यानंतर आता अभिनेत्री कतरिना कैफ देखील आई होणार असल्याची माहिती समोर येत आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर कतरीना कैफ आणि अभिनेता विकी कौशल त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत. जेव्हापासून कतरिना हित्या प्रेग्नेंसीच्या चर्चांनी जोर धरला आहे. तेव्हापासून अभिनेत्री लाईनलाईट पासून दूर आहे. कोणत्याच इव्हेट किंवा पार्टीमध्ये देखील दोघे दिसत नाहीत.
सांगायचं झालं तर, नुकताच झालेल्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ (The Bads of Bollywood) च्या प्रमोशनसाठी देखील विकी कौशल एकटाच पोहोचला होता. त्यामुळे कतरिना हिच्या प्रेग्नेसीच्या चर्चांनी आणखी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कतरिना हिच्या प्रेग्नेंसी चर्चा रंगली आहे.
कतरिना कैफ हिचे सध्याचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण अद्याप विकी आणि कतरिना यांनी प्रेग्नेंसीबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. पण लवकरच दोघे ‘गुड न्यूज’ चाहत्यांसोबत शेअर करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर कतरिना हिचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कतरिना प्रेग्नेंट असल्याचं दिसत आहे. एका रेडिट युजरने फोटो पोस्ट केले आहेत. लाल रंगाच्या गाउनमध्ये अभिनेत्री दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीचं बेबी बम्प दिसत आहे.
फोटो शेअर करत रेडिट युजर कॅप्शनमध्ये म्हणाला, ‘कतरिना कैफचा हा नवीन BTS फोटो पहा, जो जाहिरातीसारखा दिसतो.” असं म्हटलं जात आहे की कतरिना एका जाहिरातीच्या शूट दरम्यान तिच्या गरोदरपणाची घोषणा करू शकते…’ सध्या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नवीन फोटो व्हायरल झाल्यानंतर कतरिना कैफ हिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘कतरिना कैफ प्रेग्नेट असल्याचं कळल्यानंतर आनंद झाला आहे.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कतरिना कैफ हिचं खूप खूप अभिनंदन…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘कोणाची नजर नको लागायला… याच गोष्टीची प्रतिक्षा होती…’ अनेकांना पोस्टवर कमेंट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.