AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कतरिना कैफ वयाच्या 42 व्या वर्षी होणार आई; ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये चाहत्यांना मिळणार आनंदाची बातमी?

कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या बातम्या पुन्हा एकदा पसरू लागल्या आहेत. या अफवांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 42 व्या वर्षी कतरिना आई होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विकी कौशल आणि कतरिनाच्या जवळच्या सुत्राने खुलासा केल्याचं म्हटलं जातं. विकी कौशल आणि कतरिनाने मात्र यावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही

कतरिना कैफ वयाच्या 42 व्या वर्षी होणार आई; ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये चाहत्यांना मिळणार आनंदाची बातमी?
Katrina Kaif will become a mother at the age of 42Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 16, 2025 | 5:52 PM
Share

चाहत्यांना आपल्या आवडीच्या सेलिब्रिटींबद्दल जाणून घ्यायला नेहमीच आवडत असतं. काही बातम्यांची तर ते आवर्जून वाट पाहत असतात. जसं की एखाद्या अभिनेत्याच्या लग्नाची तर एखाद्या अभिनेत्रीची लग्नानंतर आई होण्याची. अशीच एक अभिनेत्री आहे जिच्या गुड न्यूज देण्याबद्दल चाहते आवर्जून वाट पाहत आहेत. ती अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ.

वयाच्या 42 व्या वर्षी कतरिना आई होणार?

कतरिना कैफच्या प्रेग्नंट असण्याच्या अनेकदा बातम्या पसरल्या आहेत. अनेकदा फोटोही व्हायरल झाले आहेत. पण कतरिना आणि विकीने याबाबत कधीही भाष्य केलं नाही. दरम्यान आताही कतरिना प्रेग्नंट असल्याच्या अफवा येऊ लागल्या आहेत. वयाच्या 42 व्या वर्षी कतरिना आई होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ती लवकरच आई होण्याची आनंदाची बातमी देऊ शकते असं म्हटलं जात आहे.

कतरिना कैफच्या प्रेग्नंट असण्याची बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल

कतरिना कैफच्या प्रेग्नंट असण्याची बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तथापि, आतापर्यंत विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी या प्रकरणावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीनुसार, कतरिना कैफ या वर्षी आई होऊ शकते. कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या बातमी येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तिच्या आई होण्याच्या बातम्या आल्या आहेत.

विकी आणि कतरिना यांच्या एका जवळच्या सूत्राने केला खुलासा 

मात्र एका वृत्तानुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या जवळच्या सूत्रांनी आता हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की कतरिना कैफ प्रेग्नंट आहे आणि ती मॅटरनिटी ब्रेकवर आहे. एका चॅनलशी बोलताना विकी आणि कतरिना यांच्या एका जवळच्या सूत्राने याबाबत ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, विकी आणि कतरिना या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये चाहत्यांना ही आनंदाची बातमी देऊ शकतात. जेव्हापासून कतरिनाच्या प्रेग्नंसीची बातमी व्हायरल झाली आहे. तेव्हापासून कतरिना देखील काही प्रमाणात सोशल मीडियापासून, तसेत प्रसिद्धीपासून दूर आहे.

View this post on Instagram

A post shared by Space NK (@spacenk)

कतरिना आणि विकी लग्नाच्या 4 वर्षांनंतर पालक होणार

कतरिना कैफने मात्र या अफवांबद्दल एकदाही बोललेले नाही आणि तिने प्रेग्नंसीचे कोणताही संकेत दिलेला नाही. तथापि, ‘बॅड न्यूज’च्या प्रमोशन दरम्यान जेव्हा विकीला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो हसला आणि म्हणाला की या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. पण जर आता आलेल्या कतरीनाच्या प्रेग्नंसीच्या या बातमीमध्ये काही तथ्य असेल तर कतरिना आणि विकी लग्नाच्या 4 वर्षांनंतर पालक होतील.

कतरिना कैफ आणि विकी कौशल कायमच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खाजगी राहिले आहेत 

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे लग्न 9 डिसेंबर 2021 रोजी झाले. दोघांनीही त्यांच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबासह राजस्थानमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं. लग्नापूर्वीही चाहत्यांना कतरिना आणि विकीच्या लग्नाची काहीच कल्पना नव्हती. या जोडप्याने अचानक त्यांच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. लग्नापूर्वीही कतरिना आणि विकीने त्यांचे प्रेम जीवन खूप वैयक्तिक ठेवले होते. त्यामुळे आता कतरिनाच्या प्रेग्नंसीबद्दलची बातमी देखील अशीच अचानक मिळेल अशी आशा आता चाहत्यांना लागून राहिली आहे.

मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.