New Project | सुपरस्टार विजयसोबत साऊतमध्ये एन्ट्री, कतरिना दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार!

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे (Katrina Kaif ) नाव नेहमीच चर्चेत असते. कतरिनाकडे सध्या बरेच चित्रपट आहेत.

New Project | सुपरस्टार विजयसोबत साऊतमध्ये एन्ट्री, कतरिना दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे (Katrina Kaif ) नाव नेहमीच चर्चेत असते. कतरिनाकडे सध्या बरेच चित्रपट आहेत. मात्र, नुकताच कतरिनाला आणखी एक मोठा चित्रपट मिळाला आहे. आता कतरिना साऊतचा स्टार अभिनेता विजय सेतुपतीसोबत काम करणार आहे. विजय सेतुपतीची साऊतमध्ये प्रचंड फॅन फॉलोइंग आहे आणि आता जेव्हा विजय आणि कतरिना एकत्र चित्रपटामध्ये दिसणार म्हटल्यावर तेव्हा मोठा धमाका होणार आहे. फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार श्रीराम राघवनच्या चित्रपटात विजय आणि कतरिना मुख्य भूमिकेत असतील. (Katrina Kaif’s entry in the movie South)

विजय सुपरहिट तमिळ चित्रपट मानागरमच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी तयार आहे. संतोष सिवन दिग्दर्शित या चित्रपटात विजय कॉमेडी करताना दिसणार आहे. कतरिना लवकरच सूर्यवंशी चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. सूर्यवंशी हा चित्रपट मागील वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता पण कोरोनामुळे ते शक्य होऊ शकले नाही. 2021 मध्ये सूर्यवंशी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याशिवाय कतरिना सध्या भूत-पोलिस चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात अभिनेत्रीसोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

विकी काैशल आणि कतरिना कैफचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही भाष्य केले नाही. दोघेही पार्टी आणि प्रोग्राममध्येसोबत असतात एवढेच नव्हे तर या दोघांनीसोबतच नवीन वर्ष देखील साजरे केले, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कतरिनाने तिच्या बहिणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, पण त्या फोटोमध्ये बहिणीच्या मागे असलेल्या आरशात विकीची झलक दिसत होती. कतरिनाला जेव्हा हे समजले तेव्हा तिने तो फोटो डिलीट केला मात्र, तोपर्यंत तो फोटो व्हायरल झाला.

संबंधित बातम्या : 

सहावारी साडी नेसून अदा शर्मा समुद्रकिनारी, कार्टव्हील उडी पाहून चाहते हैराण!

‘नवे वर्ष, नवा हर्ष’, जान्हवी कपूरचं ‘गुड लक जेरी’चं शूटिंग सुरु, पाहा खास लूक…

(Katrina Kaif’s entry in the movie South)

Published On - 10:13 am, Tue, 12 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI