KBC 17 Independence Day Special: कर्नल सोफिया कुरैशी यांच्या आयुष्याबद्दल जाणून अमिताभ बच्चन भावूक…, तुम्हीही म्हणाल…

KBC 17 Independence Day Special: कर्नल सोफिया कुरौशी यांनी स्वतःच्या आयुष्याबद्दल केला मोठा खुलासा, ऐकून अभिताभ बच्चन देखील झाले भावूक, तुम्ही देखील म्हणाल...

KBC 17 Independence Day Special: कर्नल सोफिया कुरैशी यांच्या आयुष्याबद्दल जाणून अमिताभ बच्चन भावूक..., तुम्हीही म्हणाल...
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Aug 15, 2025 | 4:03 PM

Kaun Banega Crorepati 17 Update: टीव्ही विश्वातील सर्वात चर्चित शो ‘कोन बनेगा करोडपती 17’ चा आज प्रसारित होणारा एपिसोड अत्यंत खास असणार आहे. कारण शोमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत हॉट सीटवर भारताच्या तीन वीरांगना बसणार आहेत. ज्यांनी ऑपरेश सिंदूर दरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली. या तीन शूर महिलांची नावे आहेत भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरैशी, भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि भारतीय नौदलाच्या कमांडर प्रेरणा देवस्थळी.

केबीसीच्या या खास एपिसोडमध्ये, या धाडसी महिला केवळ त्यांच्या शौर्याच्या कहाण्या सांगणार नाहीत तर महिला सक्षमीकरणावर हृदयस्पर्शी गोष्टीही सांगतील, ज्या ऐकून स्वतः अमिताभ बच्चन देखील भावूक झाले. सध्या एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कर्नल सोफिया कुरैशी त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगताना दिसत आहेत.

कर्नल सोफिया कुरेशी त्यांच्या कुटुंबाच्या गौरवशाली इतिहासाबद्दल बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं, त्या अशा कुटुंबातून आल्या आहे जिथे सर्वजण सैन्यात होते. सोफिया कुरेशी यांनी असेही उघड केलं की त्यांच्या पणजीचे पूर्वज राणी लक्ष्मीबाई यांच्यासाठी लढले होते.

 

 

पुढे कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, ‘सैन्यातील प्रत्येक सैनिकाला सारखंच प्रशिक्षण मिळतं, मग तो अधिकारी असो वा सैनिक, आणि ही समानता सैन्याला मजबूत बनवते.’ सध्या सर्वत्र कर्नल सोफिया कुरेशी यांचं कौतुक होत आहे.

केबीसीच्या आगामी एपिसोडमध्ये, विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी महिला सक्षमीकरणाबद्दल बोलताना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतली. ‘एयरक्राफ्टला हे माहित नसतं की त्याच्या नियंत्रणाखाली पुरुष बसला आहे की महिला.” दरम्यान, त्या समाजाच्या मानसिकतेवरही हल्ला करताना दिसणार आहेत जिथे मुलींना फक्त पोळ्या बनवायला शिकवलं जातं. बाईक चालवण्यापेक्षा कठीण मला पोळ्या करणं वाटतं…’ असं देखील विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या.

कमांडर प्रेरणा देवस्थळी यांचे विचार त्यांच्या सहकाऱ्यांसारखेच आहेत. केबीसीच्या प्रोमोमध्ये, त्या म्हणाल्या, माझ्या टीमला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी जे काही करेन ते मी चांगल्या प्रकारे करेन. हा आत्मविश्वास इतर महिलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. मला इतर महिलांसाठीही प्रेरणास्थान व्हायचे आहे… असं देखील कमांडर प्रेरणा देवस्थळी म्हणाल्या.