18 वर्षांपेक्षा कमी वयाचे तरुण कंडोम किंवा प्रेग्नन्सी किट खरेदी करू शकतात का? काय म्हणतो कायदा?
आपल्या समाजात लैंगिक शिक्षणाबद्दल अनेक संकोच आणि गैरसमज आहेत. अनेकदा तरुण मुलं विचारतात की ते मेडिकल स्टोअरमधून प्रेगा न्यूज सारखे कंडोम किंवा गर्भधारणा चाचणी किट खरेदी करू शकतात का? यावर कायदा काय म्हणतो जाणून घेऊ...

आपल्या समाजात काही गोष्टींवर आजही सविस्तर चर्चा होत नाही. लैंगिक शिक्षणाबद्दल अनेक संकोच आणि गैरसमज आहेत. अशात 18 वर्षांखालील तरुणांनी कंडोम किंवा प्रेग्नन्सी किट खरेदी योग्य आहे की अयोग्य आणि यावर कायदा काय म्हणतो जाणून घेऊ.. कंडोम, सॅनिटरी नॅपकिन्स आणि गर्भधारणा चाचणी किट हे भारतातील ओटीसी (ओव्हर द काउंटर) उत्पादन आहे. ओटीसी उत्पादने अशी आहेत ज्यांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नसते.
कायदेशीररित्या कंडोम खरेदी करण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. याचा अर्थ 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे तरुण देखील कंडोम खरेदी करू शकतात. जर मेडिकल स्टोअर मालकाने नकार दिला तर ते कायद्यामुळे नाही तर त्याच्या सामाजिक विचारसरणीमुळे तो संबंधित वस्तू विकत देण्यास नकार देईल.
सांगायंच झालं तर, गर्भधारणा चाचणी किट देखील एक ओटीसी उत्पादन आहे. ते खरेदी करताना व्यक्तीचं वय महत्त्वाचं नाही. आरोग्य आणि जागरूकतेसाठी हे एक सामान्य वैद्यकीय उत्पादन आहे.
कायदा कुठे लागू होतो?
येथे गोंधळ असा आहे की कंडोम खरेदी करणे कायदेशीर आहे पण 18 वर्षांखालील तरुण/ तरुणीने संमतीने लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे. भारतीय कायदा POCSO कायदा असं सांगतो की, 18 वर्षांखालील कोणाशीही लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे, जरी तो संमतीने असला तरीही. म्हणून कंडोम खरेदी करणे हा गुन्हा नाही, परंतु जर 18 वर्षांखालील लोकांनी लैंगिक संबंध ठेवले तर ते कायदेशीररित्या चुकीचं आहे.
कंडोम आणि गर्भधारणा चाचणी किट हे दोन्ही आरोग्य आणि सुरक्षिततेचं उत्पादन आहेत आणि भारतीय कायदा त्यांच्या खरेदीवर बंदी घालत नाही. परंतु 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी लैंगिक क्रियाकलाप प्रतिबंधित आहेत. म्हणून जर दुकानदार नकार देतात तर ते कायद्याच्या आधारावर नाही तर सामाजिक धारणेच्या आधारावर असेल.
याप्रकरणी जागरूकता महत्वाची आहे. जेणेकरून तरुणांना योग्य निर्णय घेता येतील. कंडोम खरेदी करणं ही लज्जास्पद गोष्ट नाही, परंतु तुमच्या वयानुसार योग्य निर्णय घेणं महत्वाचे आहे. कायदा तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे. म्हणून योग्य माहिती असणं हे सर्वात मोठं संरक्षण आहे.
