KBC मध्ये 1 कोटींचा जॅकपॉट, स्पर्धकाच्या खात्यात नक्की किती रक्कम जमा होणार?

Namrata Patil

|

Updated on: Dec 08, 2020 | 1:26 PM

पण एक कोटी मिळणाऱ्या स्पर्धकाला ती पूर्ण रक्कम दिली जाते का, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. (KBC How Much Amount Contestant Will Get)

KBC मध्ये 1 कोटींचा जॅकपॉट, स्पर्धकाच्या खात्यात नक्की किती रक्कम जमा होणार?

Follow us on

मुंबई : अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम म्हणजेच ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC). छोट्या पडद्यावरील या शो घराघरात प्रसिद्ध आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी प्रश्नांची उत्तर दिल्यावर काही ठराविक रक्कम दिली जाते. या शोमुळे आतापर्यंत अनेकांचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पण एक कोटी मिळणाऱ्या स्पर्धकाला ती पूर्ण रक्कम दिली जाते का, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. त्याचे संपूर्ण गणित नेमकं कसं असतं, याबाबत आपण थोडी माहिती घेऊ. (Kaun Banega Crorepati How Much Amount Contestant Will Get)

केबीसीमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाला जिंकलेली पूर्ण एक कोटी रक्कम कधीच मिळत नाही. या जिंकलेल्या रकमेतून टॅक्सही कट केला जातो. त्यामुळे त्याला पूर्ण रक्कम मिळत नाही.

भारतीय कर प्रणालीचा नियम काय?

भारतीय कर प्रणालीच्या नियमानुसार, जर केबीसीचा कोणताही स्पर्धक एक कोटी रुपये जिंकला, तर त्यातून टीडीएसची रक्कम कापली जाते. जिंकलेल्या रक्कमेतून सेक्शन 194 B अंतर्गत 30 टक्के टीडीएस वजा केला जातो. त्यामुळे जर एखादा स्पर्धक 1 कोटी जिंकला असेल, तर त्याची 30 लाख रुपये रक्कम ही टीडीएस म्हणून वजा केली जाते.

तसेच टीडीएसच्या रक्कमेवर स्पर्धकाला 10 टक्के व्याजही भरावा लागतो. त्यामुळे त्याचे अजून 3 लाख रुपये कमी होतात. या गणिताप्रमाणे स्पर्धकाने जिंकलेल्या 1 कोटी या रक्कमेतून 33 लाख रुपये कमी होतात.

मात्र टीडीएसवर लागणार 10 टक्के व्याज हा प्रत्येकाला द्यावा लागत नाही. जर एखादा स्पर्धक 50 लाख रुपयांहून अधिक रक्कम जिंकला असेल, तरच त्याला टीडीएसवर व्याज द्यावा लागतो. पण जर एखादा स्पर्धक 50 लाख किंवा त्याहून कमी रक्कम जिंकला तर त्याला 10 टक्के व्याज द्यावा लागत नाही.

स्पर्धकाला नक्की किती रक्कम मिळते?

टीडीएसवरील व्याजानंतर आता स्पर्धकाच्या उरलेल्या रक्कमेतून 4 टक्के रक्कम ही सेस रुपात कपात केली जाते. म्हणजे 33 लाख या कपात केलेल्या रक्कमेवर 4 टक्के सेस द्यावा लागतो. जो साधारण 1 लाख 32 हजार इतका असतो. त्यामुळे स्पर्धकाची एकूण मिळून 34 लाख 32 हजार रुपये रक्कम कपात होते. हे सर्व पैसे कपात झाल्यानंतर आता स्पर्धकाकडे केवळ 65 लाख 68 हजार रुपये शिल्लक राहतात.

दरम्यान अनेक स्पर्धकांना 30 टक्के टीडीएसच्या रक्कमेनंतर 4 टक्के  टीडीएस द्यावा लागतो. त्यामुळे कोणत्याही स्पर्धकाने जिंकलेल्या रक्कमेतून जिंकलेली रक्कम आणि त्यातून वजा करण्यात आलेली एकूण रक्कम या गणितावरुन आपण हे सर्व मांडू शकतो.  (Kaun Banega Crorepati How Much Amount Contestant Will Get)

संबंधित बातम्या : 

‘कौन बनेगा करोडपती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI