साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा दिलदारपणा! चित्रपटाच्या टीमला भेट म्हणून दिली सोन्याची नाणी

हा एक ॲक्शन ॲडव्हेंचर ड्रामा आहे, ज्याला श्रीकांत ओडेलाने दिग्दर्शित केलं आहे. श्रीकांतनेच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाची कथा तेलंगणामधील कोळसा खाणींच्या अवतीभोवती फिरते. येत्या 30 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

साऊथच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचा दिलदारपणा! चित्रपटाच्या टीमला भेट म्हणून दिली सोन्याची नाणी
साऊथच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचा दिलदारपणा! Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 2:08 PM

हैदराबाद : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांच्या दिलदारपणाची नेहमीच चर्चा होते. RRR फेम अभिनेता रामचरणने चित्रपटाच्या टीमला 11.6 ग्रॅमची सोन्याची नाणी भेट म्हणून दिली होती. इतकंच नव्हे तर त्याने संपूर्ण टीमला त्याच्या घरी नाश्त्यालाही बोलावलं होतं. अभिनेते कमल हासन यांनी ‘विक्रम’ या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक लोकेश कनगराज यांना नवीन कार भेट दिली. तर 13 सहाय्यक दिग्दर्शकांना बाईक भेट म्हणून दिली होती. आता असाच दिलदारपणा साऊथमधल्या एका प्रसिद्ध आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याने दाखवला आहे. या अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपटाच्या टीमला 10 ग्रॅमची सोन्याची नाणी भेट म्हणून दिली आहेत.

ही अभिनेत्री आहे किर्ती सुरेश. अभिनेता नानीसोबत ती लवकरच ‘दसरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. याच चित्रपटाच्या शूटिंगच्या अखेरच्या दिवशी किर्ती भावूक झाली होती. ज्या टीममुळे तिला ‘दसरा’ या चित्रपटात दमदार काम करता आलं, त्यांच्यासाठी तिला काहीतरी खास करायचं होतं. म्हणूनच तिने युनिट मेंबर्सना 10-10 ग्रॅमचे 130 सोन्याची नाणी भेट म्हणून दिले. यासाठी तिने 70 ते 75 लाख रुपये खर्च केले आहेत.

हे सुद्धा वाचा

‘दसरा’ हा मूळ तेलुगू भाषेतील चित्रपट आहे. मात्र संपूर्ण देशात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये किर्तीने ‘वेन्नेला’ नावाची भूमिका साकारली आहे. हा एक ॲक्शन ॲडव्हेंचर ड्रामा आहे, ज्याला श्रीकांत ओडेलाने दिग्दर्शित केलं आहे. श्रीकांतनेच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाची कथा तेलंगणामधील कोळसा खाणींच्या अवतीभोवती फिरते. येत्या 30 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

कोण आहे किर्ती सुरेश?

किर्ती सुरेश ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उत्तम अभिनेत्रीसोबतच ती उत्तम डान्सर आणि पार्श्वगायिकासुद्धा आहे. किर्तीने 2000 मध्ये बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. ‘महानटी’ या तेलुगू चित्रपटातील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. किर्ती सुरेशचे वडील सुरेश कुमार हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आहेत. तर तिची आई मेनका या अभिनेत्री आहेत.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.