Yash: ‘केजीएफ’ स्टार यशने शेअर केला पत्नी आणि मुलांसोबतचा अविस्मरणीय अनुभव, म्हणाला “आमचा दृष्टीकोनच बदलला”

यशचा 'केजीएफ: चाप्टर 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. यामध्ये त्याच्यासोबत संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाचा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Yash: 'केजीएफ' स्टार यशने शेअर केला पत्नी आणि मुलांसोबतचा अविस्मरणीय अनुभव, म्हणाला आमचा दृष्टीकोनच बदलला
Yash
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 19, 2022 | 5:27 PM

KGF: Chapter 2 या चित्रपटातील मुख्य अभिनेता यश (Yash) याने नुकतीच बेंगळुरूमधील प्राणी या पाळीव प्राण्यांच्या अभयारण्याला (pet sanctuary) भेट दिली. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी राधिका पंडित (Radhika Pandit) आणि त्याची मुलं आयरा आणि यथर्व होते. यशने इन्स्टाग्रामवर त्याच्या या छोट्याशा सहलीची एक झलक शेअर केली. या संस्मरणीय अनुभवानंतर त्यांचा प्राण्यांबद्दलचा दृष्टीकोन बदलल्याचं त्याने म्हटलंय. यशने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तो त्याच्या कुटुंबासह आणि इतरांसह अभयारण्यात जाताना दिसत आहे. याठिकाणी त्यांनी पक्ष्यांना खायला घालण्याचा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा अनुभव घेतला. या व्हिडीओत यश अभयारण्यातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हातात साप आणि सरडे धरताना पहायला मिळत आहे. अभयारण्यात विविध प्रकारचे पाळीव आणि वन्य प्राणी पाहताना मुलांच्या चेहऱ्यावरी आनंदी भाव त्याने टिपले आहेत.

व्हिडीओ शेअर करताना यशने हा अनुभव त्याच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय ठरल्याचं म्हटलं आहे. त्याने लिहिलं, “एक अनुभव ज्याने आमचा दृष्टीकोन बदलला! आज संजीवने त्याला जे आवडतं ते करून आणि आम्हालाही एक अविस्मरणीय अनुभव देऊन खूप मोठं काम केलं. त्याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतोय. लहान मुलं आणि प्राण्यांना एकसारख्याच करुणेची गरज असते. संजू आणि त्याची ही टीम याठिकाणी प्राण्यांची काळजी घेते. संपूर्ण टीमचं अभिनंदन. एक संस्मरणीय दिवस, फक्त मुलांसाठीच नाही तर आम्हा सर्वांसाठी.”

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

यशने 2016 मध्ये राधिकाशी लग्न केलं. यश आणि राधिकाला 2018 मध्ये आयरा ही मुलगी झाली. एका वर्षानंतर राधिकाने यात्रव या मुलाला जन्म दिला. यश वेळोवेळी चाहत्यांसोबत त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो. यशचा ‘केजीएफ: चाप्टर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. यामध्ये त्याच्यासोबत संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाचा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें