AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तारक मेहता..’ला मिळाली चौथी सोनू; कोण आहे ही नवी अभिनेत्री?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत नव्या अभिनेत्रीची एण्ट्री झाली आहे. सोनू भिडेच्या भूमिकेत ही अभिनेत्री झळकणार असून तिने पलक सिधवानीची जागा घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच पलकने ही मालिका सोडली होती.

'तारक मेहता..'ला मिळाली चौथी सोनू; कोण आहे ही नवी अभिनेत्री?
'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची टीमImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 08, 2024 | 10:29 AM
Share

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानीने निर्मात्यांवर काही आरोप केले होते. पलक मालिका सोडण्याच्या तयारीत असताना निर्मात्यांनी तिला कायदेशीर नोटीस बजावली होती. या वादानंतर अखेर पलकने या मालिकेला रामराम केला. त्यानंतर मालिकेत सोनूची भूमिका कोण साकारणार, याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता ‘तारक मेहता..’मध्ये नव्या सोनूची एण्ट्री झाली आहे. मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी ही चौथी अभिनेत्री आहे. याआधी तीन कलाकारांनी ही भूमिका साकारली होती.

निर्मात्यांनी सोनूच्या भूमिकेसाठी खुशी मालीची निवड केली आहे. ‘तारक मेहता..’च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याची अधिकृतरित्या घोषणा झाली आहे. 7 ऑक्टोबरपासून खुशी या मालिकेती सोनूची भूमिका साकारणार असल्याचं त्यात म्हटलंय. गोकुलधाममध्ये तिचं भव्य स्वागत करण्यात येईल. त्यामुळे सोनूच्या भूमिकेत खुशी काय कमाल दाखवणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘तारक मेहता..’मध्ये याआधी अभिनेत्री झील मेहताने 2008 ते 2012 या कालावधीत सोनूची भूमिका साकारली होती. त्यानंतर निधी भानुशालीची या भूमिकेसाठी निवड झाली. 2012 ते 2019 या कालावधीत ती सोनूच्या भूमिकेत झळकली होती. नंतर 2019 मध्ये पलक सिधवानीची या भूमिकेसाठी निवड झाली होती. तिने गेल्या महिन्यात ही मालिका सोडली. मालिकेत सोनूच्या भूमिकेतील कलाकार जरी बदलले तरी त्या भूमिकेला प्रेक्षकांकडून सतत प्रेम मिळालं आहे. हेच प्रेम आता खुशीलाही मिळतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

खुशी मालीने याआधी ‘साझा सिंदूर’ या मालिकेत काम केलं होतं. अभिनयात काम करण्यापूर्वी ती मॉडेलिंग करत होती. तिने काही जाहिराती आणि ब्रँड्ससोबत कोलॅबरेशनही केलंय. खुशी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे 56 हजार फॉलोअर्स आहेत. ती अनेक फॅशन कॅम्पेन्समध्येही झळकली आहे. ‘तारक मेहता..’सारख्या लोकप्रिय मालिकेत काम करण्यात ती फारच उत्सुक आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.