AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiara Advani हिने फक्त सिद्धार्थ मल्होत्रालाच ‘या’ सेलिब्रिटींना देखील केलय डेट

फक्त सिद्धार्थ मल्होत्राच नाही तर, 'या' सेलिब्रिटींनी देखील केलय किआरा अडवाणी हिच्या मनावर राज्य; अभिनेत्री लवकरच अडकणार विवाबबंधनात...

Kiara Advani हिने फक्त सिद्धार्थ मल्होत्रालाच 'या' सेलिब्रिटींना देखील केलय डेट
Kiara Advani हिने फक्त सिद्धार्थ मल्होत्रालाच 'या' सेलिब्रिटींना देखील केलय डेट
| Updated on: Feb 05, 2023 | 1:06 PM
Share

Siddharth Kiara Wedding : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या लग्नानंतर अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) देखील अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) याच्या सोबत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. अनेक वर्ष डेट केल्यानंतर किआरा – सिद्धार्थ लवकरच विवाबहबंधनात अडकणार आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही अंदाजात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. पण सिद्धार्थ याच्या आधी किआराने अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे. पण कधीही अभिनेत्रीने तिच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहेत.

सिद्धार्थ आणि किआरा यांनी चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. किआरा आणि सिद्धार्थ यांची पहिली भेट ‘लस्ट स्टोरीज’ सिनेमाच्या पार्टी दरम्यान झाली. रिपोर्टनुसार, फक्त सिद्धार्थ मल्होत्राच नाही तर, अन्य सेलिब्रिटींनी देखील किआरा अडवाणी हिच्या मनावर राज्य केलं आहे. आज आपण किआरा हिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल जाणून घेवू. (kiara advani ex-boyfriend)

रिपोर्टनुसार, किआराने तिच्या डेब्यू सिनेमा ‘फगली’ सिनेमातील अभिनेता मोहित मारवाह याला देखील डेट केलं आहे. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान त्यांच्यामध्ये प्रेमाचा गुलाब बहरला. पण किआरा आणि मेहित यांचं नातं फार काळ टिकलं नाही. सिनेमा बॉक्स ऑफिसवरअपयशी ठरल्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले.

मोहित मारवाह याच्या सोबत ब्रेकअपच्या चर्चा समोर आल्यानंतर किआरा आणि मुस्तफा बर्मावाला यांच्यातील जवळीक वाढू लागली. मुस्तफा बर्मावाला प्रसिद्ध दिग्दर्शक अब्बास बर्मावाला यांचा मुलगा आहे. पण किआरा हिचं मुस्तफा बर्मावाला याच्यासोबत देखील नातं अधिक काळ टिकू शकलं नाही. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीने कधीही तिचं नातं सर्वांसमोर स्वीकारलं नाही. पण सिद्धार्थसोबत अभिनेत्री कायम दिसली. शिवाय अनेक ठिकाणी अभिनेत्रीने सिद्धार्थ याच्याबद्दल अनेक खुलासे देखील केले.

किआरा – सिद्धार्थ लवकरच ६ फेब्रुवारी रोजी विवाबहबंधनात अडकणार आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही अंदाजात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. दोघांच्या लग्नाची तयारी सध्या मोठ्या उत्साह सुरु आहे. त्यांच्या लग्नात कुटुंब आणि मित्र परिवार उपस्थित राहणार आहेत. ४ आणि ५ तारखेला किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाच्या आधीच्या विधी पार पडणार आहेत. (sidharth malhotra kiara advani wedding festivities)

महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सेलेब्रेटी मेहंदी आर्टिस्ट वीना नागदा यांचे फोटो समोर आल्यानंतर किआरा – सिद्धार्थ विवाहबंधनात अडकणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली. आता लवकरच किआरा – सिद्धार्थ पती – पत्नीच्या रुपात चाहत्यांच्या समोर येणार आहे. किआरा – सिद्धार्थ यांना पती – पत्नीच्या रुपात पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.