AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiran Mane : लाज वाटली पाहिजे, तुझी लायकी…MPSC आंदोलनासंदर्भात विवेक भीमनवार यांच्यावर किरण मानेंचा घणाघात

Kiran Mane : किरण माने पुण्यातील एमपीएससी आंदोलनात सहभागी झालेले. या आंदोलनादरम्यान किरण माने यांनी विवेक भीमनवार यांच्यावर टीका केली आहे.

Kiran Mane : लाज वाटली पाहिजे, तुझी लायकी...MPSC आंदोलनासंदर्भात विवेक भीमनवार यांच्यावर किरण मानेंचा घणाघात
| Updated on: Oct 07, 2026 | 2:37 PM
Share

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आंदोलन केलं होतं. गेल्या सात दिवसांपासून ते विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावरती आंदोलनाला बसले. रोहित पवार यांच्या आंदोलनाविरोधात पुणेकरांनी थेट कोर्टात धाव घेतली. रोहित पवार यांच्या आंदोलनाजवळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवला. काल या आंदोलनात अभिनेते किरण मानेही सहभागी झाले होते. त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. यासंदर्भात किरण माने यांनी पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांची पोस्ट

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत किरण माने म्हणतायत की, ‘ही मुलं जीव तोडून अभ्यास करतात आणि जेव्हा परीक्षा येते तेव्हा पेपर फुटतो. लाज वाटायला पाहिजे त्यांना. काय त्या अध्यक्षाचं नाव, भीमनवार. आडनावात भीम आहे त्याच्या. त्याला म्हणावं, जनाची नाही तर मनाची लाज असेल तर राजीनामा देईल. त्याला म्हणावं, ज्या पदावर तू बसलायस, त्या पदावर बसायची तुझी लायकी नाही. ते पद सोड, राजीनामा देणं ही तुझी नैतिक जबाबदारी आहे.’

‘पेपर लीकच्या कारस्थान्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मी या आंदोलनात तुमच्या बरोबर आहे. शेवटी सरकारला एकच सांगतो की, मुलांची परीक्षा घ्यायची असेल तर ती ज्ञानाची घ्या. शेवटी सरकारला एकच सांगतो, मुलांची परीक्षा घ्यायची असेल तर, ती ज्ञानाची घ्या. आमच्या मुलांच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नका.’ असं किरण माने शेवटी म्हणाले.

हा व्हिडिओ शेअर करत किरण माने यांनी, ‘रोहितदादांनी भ्रष्ट व्यवस्थेविरोधात विद्रोह पुकारला आहे… त्यांच्या आणि एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आवाजात आवाज मिसळून आलो ! विवेक भीमनवार… it’s done bro. एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमधले घोटाळे ही फक्त चोरी नाही… फक्त लूटमार नाही… ही महाराष्ट्रातल्या लाखो गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि मध्यमवर्गीय घरांच्या स्वप्नांची क्रूर हत्या आहे!’ असं कॅप्शन लिहिलं आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप