आमिर खान – किरण यांना कधी लग्न करायचं नव्हतंच? फक्त एका कारणामुळे अडकले विवाहबंधनात

| Updated on: Apr 07, 2024 | 2:26 PM

Aamir khan - Kiran Rao Marriage | आमिर खान याच्यासोबत कसं होतं किरण राव हिचं वैवाहिक आयुष्य? लग्न करायचं नसताना का अडकले विवाहबंधनात? अखेर 'ते' कारण समोर आलंच..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर - किरण यांच्या नात्याची चर्चा... का झाला घटस्फोट?

आमिर खान - किरण यांना कधी लग्न करायचं नव्हतंच? फक्त एका कारणामुळे अडकले विवाहबंधनात
Follow us on

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आमिर खान आणि दुसरी पत्नी किरण राव यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे. किरण राव हिने मुलाखतींच्या माध्यमातून आमिर याच्यासोबत असलेल्या नात्याचं सत्य सांगितलं. सांगायचं झालं तर, आमिर – किरण यांनी 2005 मध्ये लग्न केलं. त्यानंतर 2021 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नुकताच झालेल्या मुलाखतीत किरण म्हणाली, ‘घटस्फोट घेताना मला कोणती भीती वाटली नाही, कारण आमिर याने मला कायम सपोर्ट केलं आहे…’

‘आमिर आणि मी लग्नाआधी एक वर्ष एकत्र राहिलो होतो आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, फक्त आई – वडिलांची इच्छा होती म्हणून आम्ही लग्न केलं. मला असं वाटतं तुमच्यासाठी लग्न म्हणजे नेमकं काय आहे. कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही लग्न करत आहात… समाजाच्या ज्या मान्यता आहेत, त्या अनेकांसाठी फार महत्त्वाच्या असतात. मुलांसाठी महत्त्वाच्या असतात.’

पुढे किरण म्हणाली, ‘लग्नामुळे महिलांवर एक प्रकारचा दबाव येतो आणि ही गोष्ट आपण कधी बोलतच नाही. महिलांवर घर सांभाळणं, कुटुंबाला एकत्र ठेवणं इत्यादी जबाबदाऱ्या असतात. मी माझ्या आयुष्यात चांगली वेळ व्यतीत केली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा परिणाम माझ्यावर होत नाही.’

हे सुद्धा वाचा

‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमिर माझ्या बाजूने भक्कम उभा होता. आमचं नातं देखील भक्कम होतं. आम्ही दोघं एकमेकांचा सन्मान करतो, एकमेकांचा आदर करतो… याच कारणामुळे मला कधी त्रास झाला नाही. मला माहिती होतं की मला माझी स्पेस हवी आहे. मला स्वतःचं आयुष्य जगायचं होतं. पुढे जाण्यासाठी मला आमिर याच्यापासून विभक्त होण्याची गरज आहे. आमिर याचा सपोर्ट होता, म्हणून मला घटस्फोटाची भीती वाटली नाही…’ असं देखील किरण राव म्हणाली.

आमिर खान याची दुसरी पत्नी गेल्या काही दिवसांपासून ‘लापता लेडीज’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने तगडी कमाई केली. सांगायचं झालं तर, सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान किरण राव हिने स्वतःच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याचा खुलासा केला.