निवेदिता सराफ यांचं ते बेधडक विधान… राजकीय पक्षांमध्ये एकच खळबळ; विरोधक म्हणाले, काही लोक सत्तेसमोर लाचार…

Nivedita Saraf on Bihar Election : बिहार निवडणुकीनंतर निवेदिता सराफ यांचं BJP बद्दल बेधडक वक्तव्य, विरोधकांमध्ये संताप..., म्हणाले, 'सत्तेसमोर काही लोकं लाचार...', सर्वत्र चर्चांना उधाण

निवेदिता सराफ यांचं ते बेधडक विधान... राजकीय पक्षांमध्ये एकच खळबळ; विरोधक म्हणाले, काही लोक सत्तेसमोर लाचार...
अभिनेत्री निवेदिता सराफ
| Updated on: Nov 15, 2025 | 1:47 PM

Nivedita Saraf on Bihar Election : नुकताच बिहारमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आणि मोठ्या संख्येने भाजपचा विजय झाला. भाजप पक्षाच्या विजयाचा बोलबाला सुरु असताना दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी ‘होय… मी कट्टर भाजप समर्थक आहे…’ असं वक्तव्य केलं. ज्यामुळे विरोधकांमध्ये संतापाचं वातावरण दिसत आहे. एका कार्यक्रमात निवेदिता सराफ म्हणाल्या, आमदार संजय केळकर यांचे बिहार विजयासाठी अभिनंदन…मी कट्टर बीजेपी असल्याने मला खूप आनंद झाला…’ यावर विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय म्हणाल्या निवेदिता सराफ…

सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते आणि पती आशोक सराफ यांचे आभार मानत निवेदिता सराफ म्हणाल्या, ‘माझे गुरू, पती यांच्यामुळे आज मी आहे… त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला, याचा विशेष आनंद वाटतो… पुढे बिहार विजयासाठी आमदार संजय केळकर यांचे अभिनेनंदन करत, ‘मी कट्टर बीजेपी असल्याने मला खूप आनंद झाला….’ असं देखली त्या म्हणाल्या.

निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या, ‘माझ्या आयुष्यात अभिनयाची सुरुवात बालरंगभूमी पासून झाली. सुधा करमरकर या माझ्या गुरु आहेत. त्यांच्या संस्थेत अनेक बालनाट्य केली. मला स्टेजवर उभं राहायला कोणी शिकवलं तर ते सुधाताई यांनी. त्या काळात रत्नाकर मतकरी, सुधाताई सातत्याने बालनाट्य करत महाराष्ट्रभर दौरे करायचे… माझी वाटचाल बाल रंगभूमी पासून झाल्यामुळे मला हा माहेरचा पुरस्कार मिळाला आहे असं वाटत आहे… असं निवेदिता सराफ म्हणाल्या. पण भाजपद्दल केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांमध्ये वातावरण तापलं आहे.

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘सत्तेसमोर काही लोकं लाचार असतात तर, काही लोकं फॅन्स असतात… मधल्या काळात निवेदिता सराफ यांच्या मिस्टरांना फार मोठे पुरस्कार मिळाले… हे त्यामुळेच असेल…, गायकवाड यांचं वक्तव्य सध्या चर्चे आहे…

मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील यावर स्वतःमत व्यक्त केलं आहे. ‘निवेदिता सराफ हिचा राजकारणाशी काय संबंध… पुरस्कारासाठी गुळ लावण्याचं काम सुरू आहे…’

निवेदिता सराफ याच्यावर विरोधकांकडून होत असलेली टीका पाहता, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मात्र अभिनेत्रीची पाठराखण केली. ‘निवेदिता सराफ यांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे. भाजपला समर्थन देऊन कलाकारांच्या मनात काय आहे ते दिसतंय. त्याचं राजकारण कुणी करू नये… असं दरेकर म्हणाले.