AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election Results 2025 : होय, मी कट्टर भाजप समर्थक… अभिनेत्री निवेदिता सराफ बेधडक बोलल्या

Bihar Election Results 2025 : देशभरात सध्या भाजपचे वारे वाहत आहे आणि त्याचा प्रत्येक नुकताच झालेल्या बिहार निवडणुकीत दिसून आला. बिहारमध्ये भाजपच्या विजयानंतर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी भाजपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Bihar Election Results 2025 : होय, मी कट्टर भाजप समर्थक... अभिनेत्री निवेदिता सराफ बेधडक बोलल्या
अभिनेत्री निवेदिता सराफ
| Updated on: Nov 15, 2025 | 1:36 PM
Share

Nivedita Saraf on Bihar Election : बिहारमध्ये भाजप पक्षाचा विजय झाल्यामुळे मंत्र्यांसोबत कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि जल्लोषाचं वातावरण आहे. पण त्याआधी बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल कसा लागणार? कोणाला बहुमत मिळणार, एनडीएची पुन्हा एकदा सत्ता येणार की? महाआघाडी बाजी मारणार… याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशात निकाल जाहिर होत असताना भाजप सर्वाधिक म्हणजे 95 जागांवर आघाडीवर आहे. यंदाच्या निवडणुकीनंतर भाजप बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर नितीशकुमार यांच्या जेडीयूचा नंबर आहे. जेडीयू पक्षाने 82 जांगावर विजय मिळवला आहे.

अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं वक्तव्य

सर्वत्र बिहार मधील भाजप पक्षाच्या विजयाचा बोलबाला सुरु असताना दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी देखील पक्षाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या निवेदिता सराफ यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे… एका कार्यक्रमात निवेदिता सराफ यांनी वक्तव्य केलं आहे..

बिहार निवडणुकीनंतर झालेल्या एका कार्यक्रमात निवेदिता सराफ यांनी भाजप पक्षाबद्दल स्वतःचं मत सांगितलं आहे. बिहारमध्ये मिळालेल्या मोठ्या विजयाच्या शुभेच्छा देत निवेदिता सराफ म्हणाल्या, ‘मी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद होत आहे…’, निवेदिता सराफ यांचं हे वक्तव्य सध्या सर्वत्र चर्चेत आहे…

भाजपबद्दल कायम म्हणालेले अभिनेते महेश कोठारे

सांगायचं झालं तर, दिवाळी पहाट कार्यक्रमात दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपतं भरभरून कौतुक केलं होतं… ‘मी मोदीजींचा भक्त आहे… मी भाजपचा भक्त आहे. महापालिका निवडणुकीत मुंबईत भजपचाच कमळ फुलेल आणि मुंबईत भाजपचा महापौर होईल…’ असा विश्वास महेश कोठारे यांनी व्यक्त केलेला…

महेश कोठारे यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती. “महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात आणि तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

Follow Us
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप