AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Koffee With Karan : ‘कुछ कुछ होता है’साठी अनेकांचा नकार; सलमान खानने करण जोहरला अशी केली मदत ! ‘कॉफी विथ करण’ मध्ये केला खुलासा

'कुछ कुछ होता है' चित्रपटात कॅमिओ करण्यास 6 जणांनी नकार दिला होता, खुद्द सलमान खाननेच ‘कॉफी विथ करण’ मध्ये हा खुलास केला. मग या चित्रपटात सलमानची एंट्री कशी झाली ?

Koffee With Karan : ‘कुछ कुछ होता है’साठी अनेकांचा नकार; सलमान खानने करण जोहरला अशी केली मदत ! ‘कॉफी विथ करण’ मध्ये केला खुलासा
| Updated on: Oct 14, 2026 | 9:46 PM
Share

Koffee With Karan Salman Khan: सुपरस्टार सलमान खान हा नुकताच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये आला. हा या शोचा 9वा आणि अखेरचा सीझन असून, आजच त्याचा पहिला भाग रिलीज झाला आहे. करणच्या शोमध्ये आलेल्या सलमानने अनेक मोठे खुलासे केले. त्यातला एक खुलासा हा, ‘कुछ कुछ होता है’ (1998) या फिल्मच्या कास्टिंगबद्दलही आहे. दिग्दर्शक म्हणून हा करणचा पहिलाच चित्रपट होता. शाहरुख खानची यात प्रमुख भूमिका होती. पण या चित्रपटात काजोलच्या होणाऱ्या नवऱ्याची, अमनची भूमिका करण्यास कोणीच तयार नव्हतं. अनेकांनी करणला तोंडावर नकार दिल्यावर, अखेर सलमान खानने  (Salman Khan) त्याची मदत केली . मी तुझ्या चित्रपटात कॅमिओ करेन, असं खुद्द सलमाननेच त्याला सांगितलं होतं.

बॉलिवूडमध्ये तर हा किस्सा खूप लोकप्रिय आहे. चंकी पांडेच्या घरी एक पार्टी सुरू होती, त्या पार्टीत सलमानने करणला सांगितलं की माझ्या घरी ये आणि ही फिल्म मला नॅरेट कर. आपण तर सलमानला याबद्दल सांगितलं नव्हतं, तरी कोणताच अभिनेता कॅमिओ करण्यास तयार नाही, हे सलमानला कसं समजलं,असा प्रश्न करणला पडला. आता ‘कॉफी विथ करण’ च्या पहिल्या एपिसोडमध्ये खुद्द सलमानने याबद्दल सांगितलं. बहीण अलविरा खान हिनेच तुझ्या चित्रपटाबद्दल मला सांगितलं, असं सलमान करणला म्हणाला.

चंकी पांडेच्या घरी काय झालं ?

चंकी पांडेच्या घरी जेव्हा करणशी भेट झाली तेव्हाच सलमानने आपण तुझ्या चित्रपटात काम करायला तयार असल्याचं सांगितलं होतं. खान कुटुंब आणि करण जोहरचे वडील, यश जोहर यांच्यात चांगले संबंध असल्याचंही सलमानने नमूद केलं होतं. करण जोहरच्या वडिलांमुळेच सलमान खान या चित्रपटात कॅमिओ करण्यास तयार झाला.

सलमानने कोणाचं नाव घेतलं ?

तुला चित्रपटासाठी कोणी कोणी नकार दिला, तेही मला माहीत आहे, असं ‘कॉफी विथ करण’ मध्ये सलमानने करणला सांगितलं. जवळपास 5-6 अभिनेत्यांनी ‘कुछ कुछ होता’ मध्ये कॅमिओ करण्यास थेट नकार दिला होता. त्याने ( सलमान) तर दोन अभिनेत्यांची उघड नावंही घेतली. सलमान म्हणाला, ” मला वाटतं सैफ अली खानने तुला रिजेक्ट केलं. चंद्रचूड़ सिंहनेही नकार दिला, 3-4 आणखीही अभिनेते होते. ” ते ऐकून करणनेही होकार दिला आणि म्हणाला – हो , हे खरं आहे, अनेकांनी कॅमिओ करण्यास नकार दिला. ‘कॉफी विथ करण’ चा पहिला एपिसोड आज रिलीज झाला असून भाईजानने आणखी काय काय किस्से सांगितले, ते जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप