AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kriti Sanon : माझा ब्लाऊज 6 लोकांच्या..; अखेर क्रिती सनॉनने सांगितली चीड आणणारी गोष्ट

Kriti Sanon : अभिनेत्री कृती सनॉन कायम तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्रीने अशी एक गोष्ट सांगितली, ज्यांमुळे कृतीला प्रचंड चिज आलेली. कृती म्हणाली, 'माझा ब्लाऊज 6 लोकांच्या..', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कृती सनॉन हिची चर्चा रंगली आहे.

Kriti Sanon : माझा ब्लाऊज 6 लोकांच्या..; अखेर क्रिती सनॉनने सांगितली चीड आणणारी गोष्ट
Kriti Sanon
| Updated on: Oct 07, 2026 | 10:25 AM
Share

Kriti Sanon : रक्षाबंधन दरम्यान अभिनेत्री कृती सनॉन हिची एक जाहिरात वादाच्या भोवऱ्यात अडकलेली. जाहिरातीत कृती हिने घातलेल्या कपड्यांचा वाद इतक्या टोकाला गेला की, कंपनी ती जाहिरात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हटवावी लागली. त्या एका जाहिरातीमुळे कृती हिला अनेकांनी ट्रोल केलं. आता खुद्द कृती हिने यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कृती हिची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, कृती हिने अभिनेत्री करीना कपूर हिच्या ‘व्हाट वीमेन वॉन्ट’ शोमध्ये उपस्थित राहून यावर स्वतःचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

सांगायचं झालं तर, रक्षाबंधनच्या मुहूर्तावर तयार करण्यात आलेल्या जाहिरातीत कृतीने जे कपडे घातलेले, त्यामुळे वाद निर्माण झाला. भारतीय संस्कृतीत सण असताना असे कपडे कोण घालतं आणि भावाला राखी बांधनाता असे कपडे कोण घालतं? असं म्हणत अनेकांना कृती हिला ट्रोल केलं. यावर आता कृती हिने सडेतोड उत्तर दिल आहे.

‘व्हाट वीमेन वॉन्ट’ शोमध्ये करीना हिच्यासोबत बोलत असताना, कृती हिने जाहिरातीच्या मुद्द्यावर अधिक जोर दिला. यावर कृती म्हणाली, ‘मला विश्वास देखील होत नाही की, माझा ब्लाऊज प्राईम टाईमवर 6 लोकांच्या पॅनल चर्चेचा विषय ठरलेला…’, असं कृती थेटच म्हणाली. सांगायचं झालं तर, रक्षाबंधनानिमित्त रिलीज झालेल्या झिवाच्या या जाहिरातीमध्ये कृती इंडो-वेस्टर्न लूकमध्ये दिसून आली होती.

जाहिरातीमध्ये ती आपल्या भावाला आणि पाळीव कुत्र्याला राखी बांधून सण साजरा करताना दिसत होती. मात्र, जाहिरात समोर येताच सोशल मीडियावर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आणि अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं. काही लोकांनी अभिनेत्रीच्या कपड्यांना ट्रोल करत सांगितलं की, सणांच्या दिवशी असे कपडे कोण घालतं. तर अनेकांना अभिनेत्रीचं आणि तिच्या कपड्यांचं समर्थन केलं.

एवढंच नाही तर, पाळीव कुत्र्याला राखी बांधणे आणि पारंपारिक रितीरिवाजांच्या कथित कमतरतेवरूनही टीका झाली होती. कृती सनॉनने सोशल मीडियावर या संपूर्ण वादावर आपली प्रतिक्रिया दिली होती. तिने म्हटले होते की, एखादी महिला काय घालते आणि काय नाही, हा चर्चेचा विषय बनू नये. हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे.

कृती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच अभिनेत्री ‘कॉकटेल 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटील आली. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कृती कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील कृतीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...