क्रिती सनॉनही अलिबागच्या प्रेमात; ‘या’ मोठ्या प्रोजेक्टमध्ये केली गुंतवणूक

बॉलिवूडचं 'पॉवर कपल' अर्थात अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनीसुद्धा अलिबागमध्ये सी-फेसिंग बंगला खरेदी केला आहे. 2021 मध्ये जवळपास 22 कोटी रुपयांना त्यांनी हा बंगला विकत घेतला होता.

क्रिती सनॉनही अलिबागच्या प्रेमात; 'या' मोठ्या प्रोजेक्टमध्ये केली गुंतवणूक
Kriti SanonImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 5:03 PM

अमिताभ बच्चन, शाहरुख खान, विराट कोहली यांसारख्या सेलिब्रिटींना अलिबागने चांगलीच भुरळ घातली. बिग बींनंतर, शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी अलिबागमध्ये प्रॉपर्टी घेतली. त्याच यादीत आता अभिनेत्री क्रिती सनॉनच्या नावाचा समावेश झाला आहे. क्रितीने अलिबागमध्ये 2000 चौरस फुटांची जागा विकत घेतली आहे. ‘द हाऊस ऑफ अभिनंद लोढा’ (HoABL) यांच्या माध्यमातून तिने ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्याकडून ‘सोल दी अलिबाग’अंतर्गत डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हाती घेण्यात आलं आहे. त्यातच क्रितीने ही मोठी गुंतवणूक केली आहे. “अलिबाग या ठिकाणाचा विचार मी गेल्या काही काळापासून करत होते आणि माझ्या हक्काची जमीन खरेदी करण्याचा हा प्रवास खूपच सक्षम करणारा आहे”, अशी प्रतिक्रिया क्रितीने दिली आहे.

याविषयी ती पुढे म्हणाली, “मला नेमकं काय आणि कसं हवंय याबाबत मी स्पष्ट होते. शांतता, प्रायव्हसी आणि पोर्टफोलियोमधील चांगली गुंतवणूक या गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून मी हे पाऊल उचललं आहे. माझ्या या गुंतवणुकीने वडीलसुद्धा प्रभावित झाले आहेत. हे प्राइम लोकेशन आहे आणि मांडवा जेट्टीपासून फक्त 20 मिनिटांवर ही जागा आहे. त्यामुळे मला हवी तशी जागा याठिकाणी मिळाली आहे. अलिबागमध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे.”

हे सुद्धा वाचा

यानिमित्ताने क्रिती ही आता अमिताभ बच्चन यांची शेजारीण झाली आहे. कारण एप्रिल महिन्यात बिग बींनीसुद्धा याच प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली होती. त्यांनी क्रिती सनॉनने विकत घेतलेल्या जमिनीच्या शेजारी 10 हजार चौरस फुटांची जागा विकत घेतली आहे. याआधी क्रितीने बेंगळुरू आणि गोव्यातही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. गोव्यात क्रितीचा आलिशान व्हिला आहे. फक्त अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉनच नाही तर शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांचंही अलिबागमध्ये तब्बल 20 हजार चौरस फुटांवर पसरलेलं ‘हॉलिडे होम’ आहे. या बंगल्याची किंमत 15 कोटी रुपये इतकी असून त्यात पूल आणि आऊटडोअर स्पेस यांचाही समावेश आहे. सुहानाने अभिनयविश्वात पदार्पण करण्याआधीच अलिबागमध्ये 1.5 एकर जमिन विकत घेतली होती. याची किंमत जवळपास 12.91 कोटी रुपये इतकी आहे.

Non Stop LIVE Update
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.