भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री कृती सेनॉन एका जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. रक्षाबंधनची जाहिरात करताना अभिनेत्रीने जे कपडे घातले आहेत, त्यामुळे वाद टोकाला पोहचले आहे. सोशल मीडियावर अनेकांना संताप देखील व्यक्त केला.

अभिनेत्री कृती सेनॉन आता कोणत्या सिनेमामुळे चर्चेत आली नाही तर, एका ज्वेलरी ब्रँडच्या ‘रक्षाबंधन’ जाहिरातीवरून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. जाहिरातीत घातलेल्या कपड्यांमुळे कृती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. जाहिरातीत कृती रक्षाबंधन साजरी करत आहे, पण तिच्या पूजेचं ताट देखील नाहीये. तर तिने पांढऱ्या रंगाचा ब्रालेट स्टाइल ब्लाउज आणि ड्रेप्ड स्कर्ट घातला आहे. अभिनेत्रीचा ड्रेस पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे, भावासमोर असे कपडे कोण घालतं.. असं म्हणत नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर टीका केली आहे.
ही जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर काहींनी कृतीच्या लूकवर लक्ष केंद्रित केल असल, तरी अनेक नेटकऱ्यांनी तिच्या पोशाखाबाबत आणि रक्षाबंधनाच्या पारंपरिक पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केलं. यामध्ये कुटुंबातील एक सदस्य म्हणून पाळीव कुत्र्याचाही समावेश करण्यात आला असून, कृती त्याला राखी बांधताना दिसत आहे.
What nonsense is this
Inko Hindu festivals hi milte hain apna WOKE agenda chalane? 🙄🙄
Here, Kriti Sanon is “celebrating” #RakshaBandhan wearing this skimpy outfit (perhaps left over from Cocktail 2)
Kriti is not just a brand ambassador, but also a strategic investor so she… https://t.co/uk2zOLEUWp pic.twitter.com/rZrAHUDMBk
— PallaviCT (@pallavict) August 23, 2026
कृतीने कुत्र्यालाही बांधली राखी
जाहिरातीत कृती कुत्र्याला देखील राखी बांधताना दिसत आहे. सीनमध्ये कुत्रा भुंकत असताना कृती त्याला देखील राखी बांधते… जाहिरातीत, पाळीव प्राण्याला देखील कुटुंबाचा भाग दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावर देखील सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कृती हिच्या जाहिरातीची चर्चा रंगली आहे.
@kritisanon Where is Puja Ki thali ? Why are you wearing bra in front of your brother? Is this a Raksha Bandhan ? Where is Tilak ? pic.twitter.com/YzhxGKIo5b
— No Conversion (@noconversion) August 23, 2026
कृती सेनॉन हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच अभिनेत्री, शाहीद कपूर आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘कॉकटेल 2’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. त्याआधी अभिनेत्री ‘तेरे मेरे इश्क में’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने ‘दो पत्ती’ सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. कृती कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
