एकनाथ शिंदेंनंतर आता कुणाल कामराचा भाजपच्या या मोठ्या महिला नेत्यावर निशाणा
कॉमेडियन कुणाल कामराचा आणखी एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एकनाथ शिंदेंनंतर आता त्याने निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता कॉमेडियन कुणाल कामराने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला आहे. इन्स्टाग्रामवर त्याने नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो निर्मला सीतारमण यांच्यावरील विडंबनात्मक कविता वाचून दाखवताना दिसत आहे. याआधी एकनाथ शिंदेंवरील त्याच्या विडंबनात्मक गीतामुळे राज्यात नवा वाद उद्भवला होता. या गीतेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा दावा करत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार इथल्या हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली होती. मात्र त्याबद्दल माफी मागणार नसल्याचं म्हणत कुणाल सोशल मीडियावर दररोज एक व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहे. मंगळवारी त्याने सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर आता कुणाल कामराने सीतारमण यांच्याबद्दलचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
कुणाल कामराचा नवीन व्हिडीओ-
“आपका टॅक्स का पैसा हो रहा है हवाहवाई इन सडकों की बर्बादी, करने सरकार ये आयी मेट्रो है इनके मन मैं, खोद कर ये ले अंगडाई ट्रॅफिक बढाने ये है आयी, ब्रिजेस गिराने है ये आयी कहते है इसको तानाशाही”, अशी उपरोधिक कविता त्याने वाचून दाखवली आहे.




यापुढे तो म्हणतो, “आणि काही फरक पडत नाही, तुमच्या आकांशा गेल्या कचऱ्याच्या डब्ब्यात.. कॉर्पोरेट कर्मचारी हा कॉर्पोरेटपेक्षा अधिक टॅक्स भरतो आणि हे सगळं देशहितासाठी होतंय.” सीतारमण यांच्यावरील कविता तो पुढे वाचून दाखवतो.
“देश में इतनी महंगाई, सरकार के साथ है आयी लोगों की लुटने कमाई, साडीवाली दीदी आयी सॅलरी चुराने ये है आयी, मिडल क्लास दबाने ये है आयी पॉपकॉर्न खिलाने ये है याई कहते है इसको निर्मला ताई”
निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधत तो पुढे म्हणतो, ” त्या या देशाला हव्या असलेल्या जेएनयूच्या विद्यार्थिनी आहेत. हे घ्या भावा.. नेहरुंची चूक आहे. चुकीच्या विद्यापिठात त्यांनी शिक्षण घेतलंय. बनारस विद्यापिठात शिकल्या असत्या तर चांगल्या अर्थमंत्री बनल्या असत्या.”
View this post on Instagram
दरम्यान कुणालने घडलेल्या प्रकरणाबद्दल माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच माझ्या विनोदासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणाला जबाबदार धरणं योग्य नसल्याचंही त्याने म्हटलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भर देत त्याने पोलीस आणि न्यायप्रणालीला सहकार्य करण्यास तयार असल्याचंही म्हटलं आहे.