AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kusha Kapila | अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर प्रसिद्ध युट्यूबरने सोडलं मौन; म्हणाली..

प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कुशा कपिलाचं नाव अभिनेता अर्जून कपूरसोबत जोडलं जात आहे. या चर्चांवर अखेर तिने मौन सोडलं आहे. त्याचप्रमाणे घटस्फोटाविषयीही ती मोकळेपणे व्यक्त झाली.

Kusha Kapila | अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर प्रसिद्ध युट्यूबरने सोडलं मौन; म्हणाली..
Kusha Kapila and Arjun KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 07, 2023 | 12:48 PM
Share

मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर कुशा कपिला हे सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध नाव आहे. कुशा लवकरच आगामी ‘सुखी’ आणि ‘थँक्यू फॉर कमिंग’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएशनपासून ती आता अभिनयाकडे वळतेय. काही दिवसांपूर्वीच कुशा तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. पती झोरावर सिंह आहलुवालियाला घटस्फोट दिल्यानंतर कुशाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने त्या कठीण काळाविषयी आणि त्याचसोबत अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

झूम एंटरटेन्मेंट चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कुशा म्हणाली, “पब्लिक पर्सन म्हणजेच सेलिब्रिटी असल्याचा हा एक भाग आहे हे मी समजू शकते. तुम्ही जर सोशल मीडियावर प्रसिद्ध असाल तर कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना, त्यामुळे हे घडणारच. सध्या मी दररोज स्वतःला अधिकाधिक मजबूत करण्यावर भर देतेय. याच गोष्टीकडे माझं पूर्ण लक्ष आहे. प्रत्येक दिवशी मला स्वतःला समजवावं लागतंय आणि इतरांच्या टिकेचा स्वतःवर काहीच परिणाम होऊ नये याची काळजी घ्यावी लागतेय. पण या जखमासुद्धा लवकरात लवकर भरून निघतील अशी आशा आहे.”

View this post on Instagram

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor)

कुशा कपिलाने सोशल मीडियावर घटस्फोट जाहीर करताच काही दिवसांनी तिचं नाव अभिनेता अर्जुन कपूरशी जोडलं जाऊ लागलं. अफेअरच्या या चर्चांवर तिने इंस्टाग्रामवर पोस्ट लिहित प्रतिक्रिया दिली होती. ‘रोज स्वतःबद्दल इतकं काही बकवास वाचून मला आता स्वतःशीच एक औपचारिक ओळख करून द्यावी लागेल असं दिसतंय,’ असं तिने लिहिलं होतं. आता या मुलाखतीत कुशाला अर्जुनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “त्यावर उत्तर देऊन मला त्या चर्चांना आणखी खतपाणी द्यायचं नाहीये. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास मला असं वाटत नाही की त्यावर उत्तर देऊन मी त्याला आणखी महत्त्व द्यावं.”

कुशा याआधी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘मसाबा मसाबा’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय तिने ‘सेल्फी’ आणि ‘प्लॅन ए प्लॅन बी’ या चित्रपटांमध्येही काम केलं होतं. इतकंच नव्हे तर करण जोहरच्या ‘घोस्ट स्टोरीज’ चित्रपटातही तिने छोटीशी भूमिका साकारली होती.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.