Nikkhhil Chavaan: ‘लागीरं झालं जी’ फेम निखिल चव्हाणला ‘छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार’

पुरंदर किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात युवराज शहाजीराजे संभाजीराजे भोसले, खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार रोहित पवार, आमदार संजय जगताप, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते या पुरस्काराने निखिलला सन्मानित करण्यात आलं.

Nikkhhil Chavaan: 'लागीरं झालं जी' फेम निखिल चव्हाणला 'छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार'
Nikhil ChavanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 2:25 PM

मालिका, चित्रपटातील वेधक आणि मुख्य भूमिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला चार्मिंग चेहरा म्हणजे निखिल चव्हाण (Nikkhhil Chavaan). अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या निखिलचा नाटक, मालिका, चित्रपट, वेबी सीरिज असा वाढतच जाणारा अभिनयकौशल्याचा आलेख वाखाणण्याजोगा आहे. कुठल्याही कलाकाराचा प्रवास साधा सरळ सोपा असा कधीच नसतो. तसंच आजवर निखिललासुद्धा अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. त्याची धडपड, शिकण्याची उर्मीच त्याला आज कामी आली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय ‘छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार 2022’ (Chhatrapati Sambhaji Maharaj Gaurav Award) निखिल चव्हाणला जाहीर करण्यात आलेला आहे. सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल त्याला हा पुरस्कार गौरव करण्यात आला. (Lagira Zhala Jee)

छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती सोहळ्यानिमित्त शनिवार 14 मे रोजी पुरंदर किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात युवराज शहाजीराजे संभाजीराजे भोसले, खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार रोहित पवार, आमदार संजय जगताप, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते या पुरस्काराने निखिलला सन्मानित करण्यात आलं. विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. आजवर सिनेक्षेत्रात या पुरस्काराचे मानकरी दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते अमोल कोल्हे, अभिनेते भरत जाधव, अभिनेते अंकुश चौधरी, अभिनेते अशोक समर्थ हे ठरले होते. यंदा या मानकरांच्या यादीत अभिनेता निखिल चव्हाणचा समावेश झाला आहे.

हे सुद्धा वाचा

निखिलची पोस्ट-

“अभिनयक्षेत्रात आजवर केलेल्या कामगिरीची याहून चांगली पोचपावती असूच शकत नाही. हा पुरस्कार मला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी म्हणजेच पुरंदर किल्ल्यावर मिळाला आहे आणि किल्ल्यावर पुरस्कार मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण महाराजांचे किल्ले आपल्यासाठी आदरणीय आहेत असं मला वाटतं. अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटतेय ती म्हणजे, हा गडकिल्ला इंडियन डिफेन्सच्या हातात आहे, त्या गडकिल्ल्यावर हा पुरस्कार मला मिळाला ही नक्कीच माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. खरंच भरून पावलो. दिग्गज सिनेअभिनेते या पुरस्काराचे याआधी मानकरी ठरले आहेत. मी माझी बरोबरी अर्थात त्यांच्याबरोबर करू शकत नाही. मात्र त्यांच्या बरोबरीने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी कायमच लक्षणीय असेल. माझे कुटुंब, माझे चाहते आणि संबंध जनतेचा मी कायम ऋणी असेन, कारण आज त्यांच्यामुळे मी आहे,” अशी प्रतिक्रिया निखिलने यावेळी दिली.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.