Salman Khan: पनवेल फार्महाऊसमध्ये सलमानला मारण्याचा कट; असा होता लॉरेन्स बिश्नोई गँगचा ‘प्लॅन बी’

| Updated on: Sep 15, 2022 | 3:46 PM

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाला मारण्यापूर्वी लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला दुसऱ्यांदा मारण्याची योजना आखली होती. प्लॅन ए अयशस्वी झाल्यानंतर बिश्नोई टोळीने प्लॅन बी तयार केला.

Salman Khan: पनवेल फार्महाऊसमध्ये सलमानला मारण्याचा कट; असा होता लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्लॅन बी
Salman Khan: पनवेल फार्महाऊसमध्ये सलमानला मारण्याचा कट
Image Credit source: Twitter
Follow us on

काही महिन्यांपूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून (Lawrence Bishnoi Gang) अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. सलमानचे वडील सलीम खान यांना धमकीची चिठ्ठी मिळाली होती. मात्र सलमानला मारण्याचा प्लॅन फसल्यानंतर बिश्नोई टोळीने दुसरी योजना आखली. पंजाब पोलिसांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली. बिश्नोई टोळीने दुसऱ्यांदा सलमानवर हल्ला करण्याचा कट रचला होता, असं पोलिसांनी सांगितलं. त्याच्याच पनवेलच्या फार्महाऊसमध्ये (Panvel Farmhouse) मारण्याची योजना आखली होती.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाला मारण्यापूर्वी लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला दुसऱ्यांदा मारण्याची योजना आखली होती. प्लॅन ए अयशस्वी झाल्यानंतर बिश्नोई टोळीने प्लॅन बी तयार केला. गोल्डी ब्रार व्यतिरिक्त इतर कोणीही या योजनेचं नेतृत्व करत नव्हतं. गोल्डीने सलमानला मारण्यासाठी कपिल पंडित याला (लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर) निवडलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी कपिलला नुकतंच भारत-नेपाळ सीमेवरून अटक केली आहे.

पनवेलच्या फार्महाऊसमध्ये सलमानला जीवे मारण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. यासाठी कपिल पंडित, संतोष जाधव, दीपक मुंडी आणि इतर शूटर पनवेलमध्ये भाड्याने खोली घेऊन राहण्यासाठी आले होते. संपूर्ण रस्त्याची रेकी केल्यानंतर त्यांनी ही खोली भाड्याने घेतली होती. बिष्णोई टोळीचे सदस्य जवळपास दीड महिन्यापासून या खोलीत राहत होते, असंही पोलिसांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

हिट अँड रन प्रकरणात सलमान खानचं नाव आल्यापासून तो त्याच्या वाहनाचा वेग खूपच कमी ठेवतो, हे लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीला माहीत होतं. रेकीदरम्यान त्यांना हे देखील कळलं होतं की जेव्हा कधी सलमान त्याच्या फार्महाऊसवर येतो, तेव्हा त्याचा पर्सनल बॉडीगार्ड शेरा त्याच्यासोबत असतो. यामुळेच बिष्णोई टोळीच्या सर्व शूटर्सकडे लहान शस्त्रांची पिस्तुल काडतुसं होती.

लॉरेन्स बिश्नोईला सलमान खानची हत्या करून 1998 च्या काळवीट शिकारीचा बदला घ्यायचा आहे. बिश्नोईने स्वतः पोलिस रिमांडमध्ये खुलासा केला की, 2018 मध्ये सलमान खानच्या हत्येसाठी त्याने सर्व तयारी केली होती. यासाठी त्याने एक खास रायफलदेखील खरेदी केली होती, ज्यासाठी त्याने 4 लाख रुपये दिले होते.