मुंबईच्या उत्तर-पश्चिम जागेसाठी शिंदे गटाकडून ‘या’ मराठी अभिनेत्याला मिळू शकतं तिकिट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकार राजकीय क्षेत्रात प्रवेश करताना दिसत आहे. कंगना राणौत, अरुण गोविल यांच्यानंतर आता मुंबईच्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी काही मराठी कलाकारांची नावं चर्चेत आहेत.

मुंबईच्या उत्तर-पश्चिम जागेसाठी शिंदे गटाकडून 'या' मराठी अभिनेत्याला मिळू शकतं तिकिट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 9:38 AM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून आपला तगडा उमेदवार मतदारसंघात पाठवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी केवळ राजकीय क्षेत्रातूनच नाही तर मनोरंजन क्षेत्रातील नामवंतांचाही विचार केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता गोविंदाने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. आता शिंदे गट काही मराठी कलाकारांनाही रिंगणात उतरवण्याची तयारी करत असल्याचं कळतंय. यासाठी त्यांनी काहींची चाचपणीदेखील सुरू केली आहे. मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी काही मराठी कलाकारांची चाचपणी सुरू असल्याचं समजतंय.

उत्तर-पश्चिम मतदारसंघात मराठी किंवा अमराठी यापैकी कोणाला सर्वाधिक पाठिंबा मिळू शकतो, याचं सर्वेक्षण शिंदे गटाकडून करण्यात आलं. या मतदारसंघासाठी नुकतेच काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या संजय निरुपम यांची चाचपणी सुरु असल्याचं कळतंय. पण निरुपम हा अमराठी चेहरा असल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून फारसा कौल मिळत नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे शिंदे गटाने आता मराठी कलाकारांच्या नावांची चाचपणी सुरू केली आहे. अभिनेत शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर आणि सचिन खेडेकर यांची सध्या चाचपणी सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पोंक्षे हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत येतात. सोशल मीडियावर किंवा विविध कार्यक्रमांमध्ये ते त्यांची हिंदुत्त्ववादी भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसतात. त्यामुळे वायव्य मुंबईसाठी त्यांचं नाव अग्रस्थानी असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता मुंबईतील या महत्त्वाच्या मतदारसंघासाठी कोणाची वर्णी लागेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे. बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणौत, रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत श्रीराम यांची भूमिका साकारून घराघराच पोहोचलेले अभिनेत अरुण गोविल यांना भाजपकडून लोकसभेचं तिकिट मिळालं आहे. हिमाचलप्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून कंगना तर उत्तरप्रदेशमधील मेरठ या मतदारसंघातून अरुण गोविल निवडणूक लढवणार आहेत.

Non Stop LIVE Update
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....