AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhu Kambikar Passes Away: नाना पाटेकरांनंतर सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का, ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन

Madhu Kambikar: ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन झालं. त्या केवळ अभिनेत्री नव्हत्या, तर लोककलेचा वारसा जपणाऱ्या समर्थ लावणी कलावंतही होत्या.

Madhu Kambikar Passes Away: नाना पाटेकरांनंतर सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का, ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन
मधू कांबिकरImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 12, 2026 | 10:32 AM
Share

Madhu Kambikar: मराठी लोककला आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचं पुण्यात निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. दीर्घ आजारातून त्यांचं निधन झाल्याची माहिती, सुनेनं दिली. गेल्या काही वर्षांपासून त्या अंथरुणाला खिळून होत्या. रंगमंचावर लावणी सादर करत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यानंतर त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. लावणी, लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून मधू कांबीकर यांनी आपल्या कलेची छाप पाडली. ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेला व्यापक ओळख मिळवून देण्यातही त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे.

मधू कांबीकर यांचा जन्म 28 जुलै 1953 रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द इथं झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी कलाक्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं. कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर 1973 मध्ये मुंबईतील लालबाग इथल्या न्यू हनुमान थिएटरमधून त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली. लावणी आणि लोकनृत्याच्या सादरीकरणातून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.

मधू कांबीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. ‘सतीची पुण्याई’, ‘शापित’, ‘हेच माझं माहेर’, ‘ह्योच नवरा पाह्यजे’, ‘झपाटलेला’, ‘एक होता विदूषक’ आणि ‘रावसाहेब’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटांतही काम केलं. चित्रपटांसोबतच लोकनाट्य आणि रंगभूमीवरही त्या सक्रिय होत्या. 1977 मध्ये ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी दिल्लीमध्ये नृत्यनाट्य सादर केलं. त्यांच्या लावणीतील सहजता, अभिनय आणि हावभाव यामुळे त्यांना महाराष्ट्रभर ओळख मिळाली.

100 हून अधिक चित्रपटांत अभिनय

‘शापित’, ‘हेच माझं माहेर’ आणि ‘राघू मैना’ यांसारख्या चित्रपटांतील कामासाठी त्यांना पुरस्कार मिळाले. ‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमातून त्यांनी लावणीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अमेरिका, दुबई, अबुधाबी आणि मॉरिशस इथंही या कार्यक्रमाचे प्रयोग झाले. अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी लावणीचं प्रशिक्षण दिलं. लोककलेशी असलेली नाळ कायम जपत मधू कांबीकर यांनी आपल्या चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत मराठी मनोरंजनविश्वाला समृद्ध केलं.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू