AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit : त्यांच्यासाठी मी पागल, मला त्यांच्या मागे…, माधुरी 17 वर्ष मोठ्या क्रिकेटरच्या प्रेमात होती तेव्हा…

Madhuri Dixit : अनेकांसोबत माधुरी दीक्षित हिचं नाव जोडण्यात आलं, पण स्वतःपेक्षा 17 वर्ष मोठ्या क्रिकेटरच्या प्रेमात वेडी होती 'धक धक गर्ल', म्हणालेली, 'मी त्यांच्यासाठी पागल आहे आणि...', क्रिकेटरचं नाव ऐकून व्हाल हैराण...

Madhuri Dixit : त्यांच्यासाठी मी पागल, मला त्यांच्या मागे...,  माधुरी 17 वर्ष मोठ्या क्रिकेटरच्या प्रेमात होती तेव्हा...
Madhuri Dixit
| Updated on: May 15, 2026 | 9:50 AM
Share

Madhuri Dixit : बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज अभिनेत्री पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज माधुरी रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज माधुरी हिचा वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहे. या चर्चांमध्ये एका भारतीय दिग्गज क्रिकेटरचं देखील नाव आहे.. ज्यावर माधुरी हिचं क्रश होतं. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने एकदा मनातील भावना व्यक्त देखील केल्या होत्या.

माधुरी हिला कोणत्या भारतीय क्रिकेटवर होतं क्रश?

ज्या क्रिकेटरबद्दल माधुरी हिने भावना व्यक्त केल्या होत्या, ते क्रिकेटर दुसरे तिसरे कोणी नाही तर, माजी क्रिकेटर सुनिल गावस्कर होते.. सुनिल गावस्कर हे माधुरी हिच्यापेक्षा जवळपास 17 वर्षांनी मोठे आहेत आणि त्यांच्या प्रेमात बॉलिवूडची धक धक गर्ल होती. एका मुलाखतीत माधुरी हिने मी त्यांच्यासाठी पागल आहे… असं देखील म्हटली होती.

मुलाखतीत माधुरी म्हणालेली, ‘मी सुनिल गावस्कर यांच्यासाठी पागल आहे… ते प्रचंड हँडसम आहेत. मला त्यांच्या मागे पळायचं आहे… ते माझ्या स्वप्नात देखील येतात…’, माधुरी हिची मुलाखत अनेक वर्ष चर्चेत राहिली… आज देखील खास प्रसंगी हा किस्सा चर्चेत येतो…

माधुरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर फार कमी काळात माधुरी बॉलिवूडचं मोठं नाव बनली… एक काळ असा होता जेव्हा माधुरी हिचं मानधन अभिनेत्यांपेक्षा देखील अधिक होतं… शिवाय 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके हैं कौन’ सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमा हीट ठरला…

‘हम आपके हैं कौन’ सिनेमात माधुरी हिच्यासोबत अभिनेता सलमान खान याने महत्त्वाची भूमिका साकारली. रिपोर्टनुसार, माधुरीने सिनेमासाठी 2.7 कोटी रुपयांचं मानधन घेतलं होतं. ही रक्कम त्या काळात फार मोठी होती… अशी देखील चर्चा रंगलेली की, सिनेमासाठी माधुरी हिच्यापेक्षा सलमान याला कमी मानधन मिळालं आहे… पण किती मिळालं होतं, याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही.

आज माधुरी 59 वर्षांची झाली आहे. तरी देखील चाहत्यांमध्ये असलेली अभिनेत्रीची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. आजही माधुरी हिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?