Madhuri Dixit : वजन कमी करताय पण कमीच होत नाही, माधुरीच्या नवऱ्याने सांगितल्या खास 7 टिप्स
Madhuri Dixit : वजन कमी होणारच... माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितेले खास टिप्स जाणून घ्या... 'या' 8 मार्गांनी वजन करा कमी..., जाणून घ्या माधुरीच्या डॉक्टर नवऱ्याने काय टिप्स सांगितल्या आहेत...

Madhuri Dixit : आजचं धकाधकीचं आयुष्य पाहता, अनेकांना सतावणारी एकच समस्या म्हणजे वाढतं वजन… वजन वाढतंय कळल्यानंतर अनेक जण सर्वात आधी डाएट आणि व्यायाम आणि वजनकाट्यावर किती वजन आहे… याकडे अधिक लक्ष देतात. पण अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी सांगितल्यानुसार, झटपट वजन कमी करण्यापेक्षा हळूहळू कमी झालेलं वजन केव्हाही चांगलं असतं. आजकाल पाहायचं झालं तर, अनेक जण ‘डाएट ट्रेंड्स’ फॉलो करतात, पण डॉक्टरांच्या नजरेत ते चुकीचं आहे… तर जाणून घ्या डॉक्टर नेने यांनी वजन कमी करण्यासाठी सांगितलेल्या खास 8 टिप्स…
डॉक्टर नेने यांनी सांगितलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, झटपट वजन कमी करण्याच्या मागे कधीच लागू नका… दीर्घकाळ टिकतील अशा समयी विकसीत करणं महत्त्वचं आहे. संतुलित आहार, रोज शारीरिक हलचाल… यामध्ये सातत्य राखल्यास वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. कोणते मोठे बदल करण्यापेक्षा हळूहळू लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करा.
दुसऱ्या टिप्सबद्दल सांगायचं झालं तर, फक्त सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी वजन कमी करु नका. वाढलेल्या वजनामुळे हृदयविकार, मधुमेह आणि झोपेशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे वजन नियंत्रित असणं फक्त बाहेरील सौंदर्यासाठीच नाही तर, आरोग्यासाठी देखील फार महत्त्वाचं आहे,
तिसरा मुद्दा म्हणजे, वजनकाट्यावर दिसणारा आकडा आरोग्याचं संपूर्ण चित्र नाही. अनेकांचं वजन स्नायूंचं प्रमाण आणि आनुवंशिकतेनुसार देखील वाढू शकतं. उंची आणि वजनाच्या आधारे शरीराचं वजन कोणत्या श्रेणीत असायला हवं… याकडे देखील लक्ष द्या. त्यामुळे फक्त एक ठराविक आकडा गाठण्यापेक्षा आरोग्याकडे लक्ष केंद्रित करा…
चौथा आणि सर्वातम महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, जास्त खाल्ल्याने वजन वाढत नाही. यामागे अनेक कारणं असू शकतात. दिवसभर बसून राहणं… शारीरिक हलचालींचा अभाव, तणावामुळे अधिक खाणं… साखरेचे अधिक सेवन, महिलांच्या समस्या जसं की, थायरॉईड यांसारख्या आजारांमुळे देखील वजन वाढू शकतं.
डॉ. नेने यांनी सांगितल्यानुसार, पाचवी टिप्स म्हणजे, वजनकाट्यावर दिसणारा आकडाच सर्वकाही नसतं. वजन कमी दिसत असलं तरी, शरीरात होणारे बदल लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. कमरेचा घेर पाहा, त्यामुळे वजन वाढलं आहे की, कमी झालं आहे… याबद्दल कळून येईल
सहावी टिप्स म्हणजे, आपलं वजन वाढत आहे, यासाठी स्वतःला जबाबदार ठरवा… त्यानुसार रोजच्या सवयी बदला.. खाण्याच्या वेळा ठरवा आणि त्याच वेळेत नाष्टा आणि जेवण करा… बाहेरच्या खाण्याकडे दुर्लक्ष करा…
सातवी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, पुरेशी झोप घ्या. 7 -8 तासांची झोप कशी पूर्ण होईल याकडे लक्ष द्या. नियमित झोपेची वेळ ठरवा आणि रात्री जास्त आणि उशिरा खाणं टाळा. रात्री 8 ते 8.30 पर्यंत जेवण करा आणि जेवल्यानंतर किमान 10 मिनिटं चाला… हा निरोगी जीवनशैलीचा फार महत्त्वाचा भाग आहे. पण तुम्ही कोणत्या आजाराचा सामना करत असाल तर, जीवनशैलीत बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या….
