धकधक गर्लच्या मुलाने घेतला मोठा निर्णय, तब्बल दोन वर्षे पाहिली वाट, माधुरी दीक्षितने शेअर केला व्हिडीओ

सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितचा छोटा मुलगा रेयान कॅन्सरग्रस्तांना मदत करण्यासाठी हिरीरीने पुढे आलाय. त्याने आपले केस कॅन्सग्रस्त रुग्णांसाठी दान केले आहेत. माधुरी दीक्षितने त्याच्या मुलाचे केस कापतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. तसेच कॅन्सविरोधी लढ्यात सर्वांनी आपले योगदान देण्याचे आवाहन केले.

धकधक गर्लच्या मुलाने घेतला मोठा निर्णय, तब्बल दोन वर्षे पाहिली वाट, माधुरी दीक्षितने शेअर केला व्हिडीओ
madhuri dixit son ryan

मुंबई : संपूर्ण देशात 7 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस म्हणून पाळला जातो. या दिवशी कॅन्सविषयी जागरूकता केली जाते. या रोगाची लक्षणे, घ्यावयाची काळजी तसेच उपचाराविषयी आज माहिती दिली जाते. कॅन्सरविरोधात लढण्यासाठी अनेक संस्था, मोठ्या व्यक्ती काम करतात. सध्या मात्र सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितचा छोटा मुलगा रेयान कॅन्सरग्रस्तांना मदत करण्यासाठी हिरीरीने पुढे आलाय. त्याने आपले केस कॅन्सग्रस्त रुग्णांसाठी दान केले आहेत. माधुरी दीक्षितने त्याच्या मुलाचे केस कापतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. तसेच कॅन्सविरोधी लढ्यात सर्वांनी आपले योगदान देण्याचे आवाहन केले.

दोन वर्षांपासून वाढवतोय केस

माधुरी दीक्षितच्या मुलाने नुकतेच आपले केस दान केले आहेत. याची माहिती खुद्द माधुरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून दिलीय. तिने एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्याखली कॅप्शनमध्ये सर्व माहिती दिली आहे. तिचा छोटा मुलगा रेयान याने कॅन्सरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कॅन्सरवर उपचार घेताना ज्या रुग्णांचे केस गेलेले आहेत, त्यांना केस दान करण्याचा निर्णय रेयान याने घेतला. त्यासाठी तब्बल दोन वर्षांपासून तो केस वाढवत होता. शेवटी केस दान करण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्यानंतर त्याने आपले केस दान कॅन्सरविरोधात लढा देणाऱ्या संस्थांना दान केले आहेत.

माधुरी आपल्या पोस्टमध्ये काय म्हणाली ?

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये माधुरीने त्याच्या मुलाने केस का दान केले याची माहिती दिलीय. तिने व्हिडीओमागची सर्व कथा सांगितली आहे. “सगळेच हिरो टोपी घालत नाहीत. कॅन्सर जागरुकता दिनाच्या निमित्ताने मला एक गोष्ट सांगायची आहे. केमोथेरेपीचा सामना करणाऱ्या कॅन्सरग्रस्तांना पाहून माझा मुलगा रेयान याला वाईट वाटले. कॅन्सरवर उपचार घेणाऱ्यांचे केस गळतात. याच कारणामुळे माझ्या मुलाने त्याचे केस दान करण्याचा निर्णय घेतला. पालक म्हणून आम्हाला त्याचा निर्णय कौतुकास्पद वाटला. मला त्याचा अभिमान वाटत आहे. नियम आणि अटीनुसार केस वाढवण्यासाठी त्याला तब्बल दोन वर्षे लागले. शेवटी हा क्षण आल्यामुळे त्याने केस दान केले,” असे माधुरीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, आज कर्करोग जागरुकता दिवस आहे. याच दिवशी माधुरीने आपल्या मुलाचा केस दान करतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून रेयानचे कौतुक केले जात आहे. तसेच कॅन्सरशी लढा देणाऱ्या रुग्णांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

इतर बातम्या :

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानदुखीचा त्रास, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता

पालखी मार्गाच्या कार्यात महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

Palkhi Marg | तब्बल 11 हजार कोटींचा खर्च, पूर्ण रस्त्यावर पदपथ, पालखी मार्ग आहे तरी कसा, काय फायदे होणार ?

(madhuri dixit son ryan nene donated his hair to help cancer society)


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI