सुंदर अभिनेत्री बनली साध्वी; ‘महाकुंभ’मधील त्या व्हिडीओची चर्चा

जगातील सर्वांत मोठा मेळावा असलेल्या महाकुंभला आजपासून सुरुवात झाली आहे. हा सोहळा पुढील 45 दिवस चालणार आहे. दर 12 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभसाठी हजारो साधू-संत आणि लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत.

सुंदर अभिनेत्री बनली साध्वी; महाकुंभमधील त्या व्हिडीओची चर्चा
mahakumbh 2025 sadhvi
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 13, 2025 | 2:36 PM

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं दर 12 वर्षांनी होणाऱ्या ‘महाकुंभमेळ्या’ला आजपासून (13 जानेवारी) पहिल्या शाही स्नानाने सुरुवात होत आहे. त्यासाठी लाखो साधुसंत आणि भाविक त्रिवेणी संगमावर दाखल झाले आहेत. 45 दिवस चालणाऱ्या या महासोहळ्यात 35 कोटी लोक भेट देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होत असलेल्या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये आले आहेत. कुंभमेळ्याशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडीओमध्ये झळकलेल्या साध्वीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

साध्वीची सुंदरता पाहून युट्यूबरने त्यांना प्रश्न विचारला, “तुम्ही इतके सुंदर आहात, मग साध्वी का बनलात?” त्यावर साध्वीने दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. साध्वीने आधी त्यांच्याविषयी माहिती दिली. “मी उत्तराखंडमधून आले आहे आणि मी आचार्य महामंडलेश्वरांची शिष्या आहे. मला आजवर जे करायचं होतं ते मी केलंय. त्यानंतर सर्वकाही सोडून मी साध्वी बनली आहे. साध्वी बनून मला माझ्या आयुष्यात एक वेगळीच शांती अनुभवता येतेय. मी 30 वर्षांची असून गेल्या दोन वर्षांपासून साध्वीच्या रुपात आयुष्य जगतेय”, असं त्यांनी सांगितलं.

याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “तुम्ही आयुष्यात बरंच काही करता. तुम्ही अभिनय केलंय, अँकरिंग केलंय, देश-विदेशात फिरलात.. सर्वकाही केलंत. त्यानंतरसुद्धा तुम्हाला आयुष्यात शांतीचा अनुभव येत नाही. पैसा आहे, प्रसिद्धी आहे.. पण मन शांत नाही. मग जेव्हा भक्ती तुम्हाला आपल्याकडे आकर्षित करते, तेव्हा तुम्ही लोकांपासून दूर जाऊन देवाच्या शरणी मग्न होता. भजन-कीर्तन, मंत्र, जप यात तुमचं मन रमू लागतं.” सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून आतापर्यंत त्याला पाच लाखांहून अधिक व्ह्यूज आणि साडेसात हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

प्रयागराज इथं दर 12 वर्षांनी महाकुंभ होत असला तरी यंदाचा महाकुंभ विशेष असल्याचं साधुसंतांचं म्हणणं आहे. सध्याची ग्रहस्थिती ही सर्वांत पवित्र असून 144 वर्षांनंतर असा योग आल्याचं सांगितलं जात आहे. या काळात प्रयागराज इथं केलेल्या कोणत्याही यज्ञाचा प्रभावही अधिक असेल, असा दावा काही साधुसंतांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us