AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharani Season 2 Trailer : पुन्हा भेटीला आली “महाराणी”, ट्रेलरची एक झलक तर पाहा, सिरीजची वाट बघाल

यावेळी राणी आपल्या पतीसोबतही संघर्ष करणार आहे. अशा स्थितीत चारही बाजूंनी घेरलेली राणी भारती या परिस्थितून कसा मार्ग काढतेय? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुक्ता शिगेला पोहोचली आहे.

Maharani Season 2 Trailer : पुन्हा भेटीला आली महाराणी, ट्रेलरची एक झलक तर पाहा, सिरीजची वाट बघाल
पुन्हा भेटीला आली "महाराणी", ट्रेलरची एक झलक तर पाहा, सिरीजची वाट बघालImage Credit source: sony live
| Updated on: Aug 01, 2022 | 9:14 PM
Share

मुंबई : हुमा कुरेशीच्या (Huma Qureshi) महाराणी या वेबसिरीजचा (Maharani Season 2 Trailer) पहिला सिझन हा तुफान गाजला होता. आता हुमा कुरेशी पुन्हा एकदा ओटीटीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. हुमाच्या ‘महाराणी’ या वेबसिरीजच्या (Maharani Webseries) सीझन 2 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यावेळेस राणी भारती जबरदस्त कमबॅक करणार आहे. हे ट्रेलरवरून स्पष्ट झाले आहे. या भागातही ती तुम्हाला राजकारणाच्या वेगवेगळ्या युक्त्या वापरताना दिसणार आहेत. तर सिरीजमध्ये नवीन कुमार अजूनही बिहारचे मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे विरोधक हात धुवून राणी भारतीच्या मागे पडले असल्याचे दाखवले आहे. यावेळी राणी आपल्या पतीसोबतही संघर्ष करणार आहे. अशा स्थितीत चारही बाजूंनी घेरलेली राणी भारती या परिस्थितून कसा मार्ग काढतेय? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुक्ता शिगेला पोहोचली आहे.

ट्रेलरमध्ये नेमकं काय?

ट्रेलरच्या सुरुवातीलाच जातीच्या आधारावर होणार्‍या भेदभावावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यासाठी अनेकजण एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. यादरम्यान एका मुलाने स्वतःला पेटवून घेतल्याचा थरारक सीनही दाखवण्यात आलाय. वर्मा आयोगाच्या विरोधात जाण्यासाठी मी काहीही करू शकतो, असा जबरदस्त डायलॉग हा मुलगा मारत पेटवून घेतना ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. दुसरीकडे मिस पाटणा स्पर्धेची विजेती मिस शिल्पा अग्रवालची हत्या करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण बिहार हादरला आहे. याचा फायदा घेत विरोधकांनी राणी भारतीला घेरण्याची तयारी चालवली आहे, असाही काहीसा भाग दाखवला आहे.

पाहा ट्रेलर

हुमा कुरेशीचं दमदार कमबॅक

एकूणच जनतेत रोष, प्रशासन गप्प, अशा संकटात राणी भारतीला दाखवण्या आलं आहे. नवीन कुमार गेल्या 17 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत ही संधी तो हातातून जाऊ द्यायचा नाही. यासाठी ते धर्माची मदत घेताना दिसतील, असाही अंदाज सध्या ट्रेलर बघून बांधला जात आहे. तर दुसरीकडे राणी भारती मागे हटणाऱ्यांपैकी नाही. परंपरा मोडण्यासाठी बनवली जाते आणि ती मोडण्यासाठी स्वतः राणी कुप्रसिद्ध असल्याचा हुमाचा जबरदस्त डायलॉगही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय.

तगडी स्टारकास्ट

‘महाराणी सीझन 2’ आधीपेक्षाही मजबूत कथा आणि अभिनयासह परतेल अशी अपेक्षा प्रेक्षकांना लागली आहे. दिग्दर्शक रवींद्र गौतम यांची ही वेब सिरीज 24 ऑगस्टला सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विनीत कुमारसोबत हुमा कुरेशी, सोहम शाह, अमित सियाल, प्रमोद पाठक आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

Follow Us
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.