आता लगाणार म्हणजे लागणारच… मराठी सिनेमाबाबतचा सरकारचा सर्वात मोठा निर्णय काय?
मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स व थेटरमध्ये स्क्रीन्स उपलब्ध व्हावी यासाठी एक स्पेशल कमिटी नेमण्यात आली आहे. सरकारने याबाबत मल्टिप्लेक्स आणि थिएटर मालकांसोबत बिथक घेऊन यावं तोडगा काढण्यासाठी समिती नेमली आहे.

सध्या मराठी सिनेमांना थिएटर मिळत नसल्यामुळे मोठा वाद सुरु झाला होता. अनेक हिंदी सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपट मल्टीप्लेक्समधून हटवण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकदा मनसेने याविरोधात आवाज उठवला होता. आता मराठी सिनेमांसाठी एक विशेष कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बैठकही पार पडली आहे.
काय निर्णय घेण्यात आला?
आज, ५ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मराठी चित्रपट संघटनेसोबत बैठक पार पडली. मराठी सिनेमांना थिएटर मिळावे म्हणून स्पेशल कमिटी स्थापन करण्यात आली आहे. येत्या दीड महिन्यात ही कमिटी अहवाल सादर करणार आहे.
मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स व थेटरमध्ये स्क्रीन्स उपलब्ध व्हावी यासाठी एक स्पेशल कमिटी नेमण्यात आली आहे. सरकारने याबाबत मल्टिप्लेक्स आणि थिएटर मालकांसोबत बिथक घेऊन यावं तोडगा काढण्यासाठी समिती नेमली आहे. समितीमध्ये गृह, नगरविकास, परिवहन, सांस्कृतिक कार्य सचिव, शासकीय अधिकारी, मल्टिप्लेक्सचे मालक, निर्माते, वितरक, विविध पक्षांच्या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. दीड महिन्यात समिती अभ्यास करून शासनाला अहवाल सुपूर्द करणार आहे.
मनसेने मल्टिप्लेक्स मालकांना दिला होता इशारा
काही दिवसांपूर्वी ‘सैयारा‘ हा हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यासोबत ‘येरे येरे पैसा 3’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला होता. मल्टीप्लेक्सच्या मालकांनी मराठी सिनेमा हटवून हिंदी सिनेमाला स्क्रीन देण्यात आली होती. तेव्हा मनसेने मल्टीप्लेक्सच्या मालकांना चांगलाच इशारा दिला होता. संदीप देशपांडे यांनी थिएटर मालकांना स्पष्ट इशारा दिला होता की, मराठी चित्रपटांना योग्य स्क्रीन्स द्याव्या, अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने कारवाई करेल. त्यांनी दावा केला की, काही मल्टिप्लेक्स मालक जाणीवपूर्वक मराठी चित्रपटांची गळचेपी करत आहेत. यशराज फिल्म्सच्या ‘सैयारा’ला प्राधान्य देत, अमेय खोपकर यांच्या निर्मितीच्या ‘येरे येरे पैसा 3’च्या स्क्रीन्स कमी करण्यात आल्या आहेत. “आम्ही याबाबत बैठक घेतली, पण सध्या यावर जास्त बोलणार नाही,” असे देशपांडे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “हिंदी चित्रपटांसाठी मराठी चित्रपटांचे स्क्रीन्स कमी करणे चुकीचे आहे. आम्ही हे सहन करणार नाही. मल्टिप्लेक्स मालकांना आम्ही पक्षातर्फे इशारा देत आहोत की, मराठी चित्रपटांना योग्य संधी द्या.”
शिंदे गटाची धडक
मुंबईतील वांद्रे येथील ग्लोबल मॉलमधील पीव्हीआर थिएटरमध्ये मराठी चित्रपटाला जागा न दिल्याबद्दल संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांचे आंदोलन केले आहे. मराठी चित्रपटांना स्क्रीन न दिल्याबद्दल तसेच नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होताच एका आठवड्यात चित्रपट गृहातून काढल्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेकडून आंदोलन होणार होते. परिस्थिती न सुधारल्यास मोठ आंदोलन करण्याचा इशारा होता. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मराठी चित्रपट संघटनेसोबत बैठक पार पडली. मराठी सिनेमांना थिएटर मिळावे म्हणून स्पेशल कमिटी स्थापन करण्यात आली आहे
