AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vanita Kharat: वनिता खरातचा WhatsApp हॅक, अनेक मित्रांनी पाठवले पैसे, नेमकं काय घडलं?

Vanita Kharat: अभिनेत्री वनिता खरातची मोठी फसवणूक झाली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिने सर्वांना याबद्दलची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे अशा फसवणुकींना बळी पडू नका, असं आवाहन तिने चाहत्यांना केलं आहे.

Vanita Kharat: वनिता खरातचा WhatsApp हॅक, अनेक मित्रांनी पाठवले पैसे, नेमकं काय घडलं?
वनिता खरातImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 21, 2026 | 9:48 AM
Share

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात हिच्यासोबत फसवणुकीची मोठी घटना घडली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत तिने सर्वांना याबद्दलची माहिती दिली आहे. एका मोठ्या कुरिअर कंपनीच्या नावाने तिच्यासोबत हा स्कॅम झाला आहे. तिचा व्हॉट्सअॅप नंबर हॅक करून कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्वांना आर्थिक मदत करण्याविषयी एक मेसेज पाठवण्यात आला होता. अनेकांनी काळजीपोटी पैसेही पाठवले. मात्र तो मेसेज मी केला नसून, माझी फसवणूक झाल्याचा खुलासा वनिता खरातने केला आहे.

नेमकं काय घडलं?

या व्हिडीओमध्ये वनिता म्हणाली, “माझ्याबरोबर एक गोष्ट घडली, खरंतर एक स्कॅम झाला. ते तुमच्यासोबत होऊ नये, म्हणून मी हा व्हिडीओ बनवतेय. माझं एक पार्सल येणार होतं आणि मला तसाच फोन आला. “मी ब्लू डार्ट कंपनीतून बोलत आहे. तुमचं पार्सल आहे आणि डिलिव्हरी बॉयला तुमचा पत्ता सापडत नाहीये. तर तुमचा पत्ता या नंबर पाठवा. मी त्याला म्हणाले की, जिथून मी पार्सल मागवलंय, तिथे आधीपासून माझा पत्ता सेव्ह आहे. त्यामुळे असं होऊच शकत नाही, असं कधी होत नाही. त्याने दोन-तीन वेळा मला फोन केल्यानंतर मी त्याने दिलेला नंबर डाएल केला. त्यानंतर काही सेकंदातच माझा व्हॉट्सअॅप हॅक झाला. व्हॉट्सअॅप माझ्या फोनमधून थेट लॉगआऊट झालं.”

मित्रमैत्रिणींनी पाठवले पैसे

पुढे तिने सांगितलं, “हॅकरने माझे कॉल त्याच्या नंबरवर वळवले, मला फोन येणं बंद झालं. माझ्या व्हॉट्सअॅपवरून माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जेवढे लोक आहेत, त्या सर्वांना एक मेसेज पाठवला. मी खूप अडचणीत आहे, मला मदत करा, एवढे-एवढे पैसे पाठवा, असा तो मेसेज होता. 62 हजार रुपये पाठवा, असं त्यात लिहिलं होतं. त्यावर माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी रिप्लाय केला आणि काहींनी तर पैसेसुद्धा पाठवले. ही खूप वाईट गोष्ट घडली आहे. ही तुमच्यासोबत घडू नये.”

कुरिअर कंपनीचा डेटा लीक कसा होतो?

“मुळात ब्लू डार्ट ही मोठी कुरिअर कंपनी आहे. त्यावर आपण अनेकजण विश्वास होतो. तर हा डेटा कसा लीक होतोय, त्यांच्या कंपनीच्या नावाने असे स्कॅम होत आहेत तर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला असे कॉल आले तर अजिबात त्याला बळी पडू नका. थोडा जरी संशय आला तर थेट तो नंबर ब्लॉक करा किंवा सायबर सेलकडे तक्रार करा. व्हॉट्सअॅपवर असे काही मदतीचे मेसेज आले तर पैसे पाठवण्याआधी एकदा क्रॉसचेक करा. आपल्याला असं वाटतं की आपल्यासोबत असं काही होणार नाही. पण त्या क्षणात आपण काय करू, हेच कळत नाही. त्यामुळे काळजी घ्या”, असं आवाहन तिने फॉलोअर्सना केलं आहे.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा