AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लातूरमध्ये कोयता दहशत, दारूच्या दुकानाजवळ प्राणघातक हल्ला, धक्कादायक प्रकार..

लातूर येथे एका तरूणावर हल्ला करण्यात आला. कोयत्याने त्याच्यावर हल्ला झाला. या प्रकरणात पोलिस अधिकचा तपास करत आहेत. मात्र, या घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

लातूरमध्ये कोयता दहशत, दारूच्या दुकानाजवळ प्राणघातक हल्ला, धक्कादायक प्रकार..
Latur attack
| Updated on: Aug 21, 2026 | 9:47 AM
Share

लातूर येथील साई नाका परिसरात रोहन वाईन्स अँड बिअर शॉपजवळ दिवसाढवळ्या एका तरुणावर कोयताने प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच विवेकानंद चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून हल्लेखोरांचा शोध तीव्र केला आहे. हल्ल्यामागील हेतू अद्याप उघड झालेला नाही. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दारूच्या दुकानाजवळ हा हल्ला करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच आता हा धक्कादायक प्रकार घडला.

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थ आणि कुटुंबीयांच्या वतीने कॅनडल मार्च काढण्यात आला. हातात मेणबत्त्या आणि निषेधाचे फलक घेत नागरिकांनी कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेत हा मोर्चा काढला. चिमुकलीला न्याय मिळावा आणि या प्रकरणातील आरोपी साहिल खैरे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, आरोपीला कठोर शासन झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चेतन कोळी याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. चेतन कोळीच्या मोबाईलमध्ये 649 अश्लील व्हिडिओ आणि एक हजारहून अधिक फोटो आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. तपासादरम्यान तक्रारदारांची संख्या वाढत असून, आतापर्यंत त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. 2022 पासून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

पोलिसांच्या तपासात आणखी काही फोटो आणि व्हिडिओ समोर येण्याची शक्यता असून, आणखी तक्रारी दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. देगलूर येथील अंध निवासी विद्यालयातील दिव्यांग मुलीचा तीन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. मयत मुलीच्या मृत्यू प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी देगलूर येथे रात्री उशिरा कॅन्डल मार्च काढण्यात आला. अंध निवासी विद्यालयातील अल्पवयीन दिव्यांग मुलगी आजारी पडली होती. उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला होता. मुलगी आजारी पडल्यावर शाळेने कळविले नाही. त्यामुळे मुलीवर उपचार करण्यासाठी विलंब झाला असा नातेवाईकांचा आरोप आहे.

Follow Us
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा