AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahima Chaudhary: तुम्ही ‘व्हर्जिन’ नसाल तर… अभिनेत्री महिमा चौधरीचा बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

लोक म्हणायचे अरे ! हे डेटिंग करत आहे! त्यांना अशी अभिनेत्री हवी असायची , जी 'व्हर्जिन' आहे. आणि तिने कुणालाही 'किस्स' केले नसेल. तसेच तुमचे लग्न झाले असेल तर तुम्हाला अत्यंत कमी कामे मिळत. आणि जर तुम्हाला मुले असतील तर तुमचे करिअर संपलेच म्हणून समजा.

Mahima Chaudhary: तुम्ही 'व्हर्जिन' नसाल तर... अभिनेत्री महिमा चौधरीचा बॉलीवूडबाबत मोठा खुलासा
Mahima Chaudhary,Image Credit source: Instagram
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 13, 2022 | 5:06 PM
Share

बॉलीवूडच्या (Bollywood) झगमगाटी दुनियेत आपले करिअर करत असताना अभिनेत्र्यांना अनेक वाईट, गैर प्रकारांना सामोरे जावे लागायचे. याबाबत अनेक अभिनेत्रींनी उघडपणे खुलासा करत त्याला वाचा फोडली आहे. यातून हॅशटॅग मीटूची चळवळ उभी राहिली. बऱ्याचदा मुलाखतीमध्ये अभिनेत्रींनी त्यांना सामोरे जाव्या लागलेल्या लैगिंक शोषण, मानसिक शोषण याबाबत खुलासा केला आहे. यातच आता 90 च्या दशकात यशस्वी अभिनेत्री म्हणून कार्यरत राहिलेल्या महिमा चौधरीने(Mahima Chaudhary) बॉलिवूडमध्ये महिलांबाबत नेमकी काय मानसिकता होती.  यावर मोठा खुलासा केला आहे. एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महिमाने बॉलीवूडमध्ये 90 च्या दशकात अभिनेत्रींना (Actress) कशी  वागणूक दिली जात होते. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवल्या जायच्या हे सांगितले आहे.

महिमा म्हणते..

90 च्या दशकात बॉलीवूड महिलांसाठी तितकी सुरक्षित नव्हती. तिथे पुरुषांची मक्तेदारी अधिक होती. पूर्वी बॉलीवूडमध्ये, एखादी अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यात एखाद्याला डेट करत असेल तर लोक म्हणायचे अरे ! ही डेटिंग करत आहे! त्यांना अशी अभिनेत्री हवी असायची , जी ‘व्हर्जिन’ आहे. आणि तिने कुणालाही ‘किस्स’ केले नसेल. तसेच तुमचे लग्न झाले असेल तर तुम्हाला अत्यंत कमी कामे मिळत. आणि जर तुम्हाला मुले असतील तर तुमचे करिअर संपलेच म्हणून समजा. अशी स्थिती पाहायला मिळत होती. मात्र इंडस्ट्रीत खूप बदल झाला आहे. पूर्वीच्या तुलनेत आता अभिनेत्रींना चांगले मानधन मिळत आहे. मोठ्या भूमिका ऑफर केल्या जात आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा करिअरवर काही ही परिणाम होत नाही. असेही ती म्हणाली आहे.

महिला केंद्रित चित्रपटांची संख्या वाढली…

अलीकडच्या काळात महिला केंद्रित चित्रपटाची संख्या बॉलीवूडमध्ये वाढली आहे. महिमाने सुभाष घई दिग्दर्शित ‘परदेस’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्यासोबत अमरीश पुरी, शाहरुख खान ही यामध्ये दिसून आले होते या. व्यावसायिक पातळीवर बोलायचे झाल्यास महिमा लवकरच अभिनेत्री कंगना राणौतच्या पॉलिटिकल ड्रामा फिल्म ‘इमर्जन्सी’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि अनुपम खेर जय प्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसून येणार आहेत

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?