Majha Hoshil Na | सई-आदित्यच्या आयुष्यात ‘जेडी’ची एंट्री, प्रसिद्ध विनोदी अभिनेता पहिल्यांदाच साकारणार खलनायक!

आदित्य कश्यपच्या आई-वडीलांचा मारेकरी आणि आदित्यचा सख्खा काका ‘जयवंत देसाई’ ऊर्फ ‘जे डी’ हा आता अनेक वर्षांनी मुंबईत परतणार आहे. त्याच्या येण्यामुळे मालिकेत एक मोठा ट्वीस्ट येणार आहे.

Majha Hoshil Na | सई-आदित्यच्या आयुष्यात ‘जेडी’ची एंट्री, प्रसिद्ध विनोदी अभिनेता पहिल्यांदाच साकारणार खलनायक!
अतुल परचुरे

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘माझा होशिल ना’ (Majha Hoshil Na) ही सध्या चांगलीच गाजते आहे. झी मराठी अवॉर्ड्समधे सर्वोत्कृष्ट मालिकेसह सर्वाधिक पुरस्कार पटकवलेल्या या मालिकेत आता ‘जे डी’ या नव्या पात्राचं आगमन होणार आहे. आदित्य कश्यपच्या आई-वडीलांचा मारेकरी आणि आदित्यचा सख्खा काका ‘जयवंत देसाई’ ऊर्फ ‘जे डी’ हा आता अनेक वर्षांनी मुंबईत परतणार आहे. त्याच्या येण्यामुळे मालिकेत एक मोठा ट्वीस्ट येणार आहे (Majha Hoshil Na Serial Update Atul Parchure will enter in Sai aditya life as JD villain).

आदित्य ग्रुपची मालकी मिळवणं आणि ज्या ब्रह्मेंमुळे आपली संपत्ती आणि कंपनीचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता, त्या ब्रह्मे भावांना देशोधडीला लावणं, ही उद्दिष्टं डोक्यात ठेवून हा कपटी, बेरकी आणि क्रूर जेडी सई-आदित्यच्या संसारात संकट बनून येणार आहे.

अतुल परचुरे साकारणार खलनायक!

मराठी-हिंदी मनोरंजन विश्वातला एक मोठा कलाकार ही भूमिका साकारत आहे. बहुढंगी भूमिका वठवणारे अभिनेते ‘अतुल परचुरे’ (Atul Parchure) जेडीच्या निमित्ताने पहिल्यांदाच खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. जेडीच्या आगमनाने आदित्यच्या जीवाला धोका निर्माण होणार असून, ब्रह्मे कुटुंबावर मोठं संकट कोसळण्याची शक्यता आहे. मालिकेत अनेक वेगवान घडामोडी घडताना दिसणार आहेत. आता आदित्यचे मामा आणि सई-आदित्य या नव्या आव्हानाला, संकटाला कसे सामोरे जाणार हे पाहणं रंजक ठरणार आहे (Majha Hoshil Na Serial Update Atul Parchure will enter in Sai aditya life as JD villain).

सई-आदित्यच्या संसारात कुरबुरी

आदित्यच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सईने घरच्यांचा विरोध पत्करून अखेर त्याच्याशी लग्न केले. एकाही बाई नसलेल्या ब्रह्मेंच्या कुटुंबात सुनबाई सईचे मोठ्या थाटामाटात स्वागत झाले. इतकेच नाही तर, सईच्या सोयीप्रमाणे ब्रह्मेंचं घर देखील बदललं. तिच्या सोयीसाठी घरात अनेक गोष्टी आल्या. मात्र, सध्या बंधूमामांच्या एका गुपितामुळे सई आणि आदित्यच्या संसारात काहीशी कुरबुर सुरु झाली आहे.

बंधूमामाचं गुपित उघड होणार?

ब्रह्मेंच्या घरात मोठे बंधू अर्थात दादा मामाच्या अयशस्वी लग्नामुळे त्यांच्यानंतरच्या इतर कोणत्याही भावांची लग्न झालेली नाहीत. मात्र, या भावंडांमध्ये ‘बंधू मामा’ अर्थात प्रभाकर ब्रह्मे यांनी गुपचूप एका पंजाबी महिलेशी लग्न केले आहे. तब्बल 14 वर्ष त्यांनी हे लग्न घरातल्यांपासून आणि समाजापासून लपवून ठेवले आहे. प्रभाकर आणि गुलप्रीत या दाम्पत्याला एक 8 वर्षांचा ‘बिल्लू’ नावाचा मुलगा देखील आहे. सई आणि आदित्यच्या लग्नात त्यांच्या गुलप्रीत मामीने त्यांची खूप मदत केली. मात्र, आता त्या बंधू मामांची पत्नी असल्याचे सईला कळले आहे. हीच गोष्ट ती आदित्यला सांगण्याचा खूप प्रयत्न करते. मात्र, आदित्यला सईच्या या गोष्टी न पटल्याने त्याने तिच्याशी अबोला धरला आहे. मात्र, आता बंधू मामाचं हे गुपित बाहेर येणार का?, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

(Majha Hoshil Na Serial Update Atul Parchure will enter in Sai aditya life as JD villain)

हेही वाचा :

Jeev Zala Yedapisa  | तब्बल 5 भाषांमध्ये अनुवाद, छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!

Photo : ‘फुलराणी… अविस्मरणीय प्रेमकहाणी’,चित्रपटाच्या माध्यमातून दरवळणार प्रेमाचा नवा सुगंध

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI