AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मलायका अरोरा हिचं कसं आहे मुलासोबत नातं? दोघांचे Whatsapp chat लीक

Malaika Arora son | मलायका अरोरा आणि मुलगा अरहान खान यांचं Whatsapp chat लीक, घटस्फोटानंतर अरबाज यांचं नाव घेत अभिनेत्री म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका आणि अरहान यांच्या नात्याची चर्चा... चॅटचा फोटो समोर आल्यानंतर चर्चांना उधाण...

मलायका अरोरा हिचं कसं आहे मुलासोबत नातं? दोघांचे Whatsapp chat लीक
| Updated on: May 14, 2024 | 11:26 AM
Share

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण घटस्फोटानंतर देखील अरबाज आणि मलायका मुलगा अरहान याच्यासाठी एकत्र येतात. आता देखील मलायका आणि मुलगा अरहान यांच्या Whatsapp chat फोटो समोर आले आहेत. Whatsapp chat वरुन कळतं की मलायका – अरहान यांच्यामध्ये आई – मुलाच्या नात्याशिवाय मैत्रीचं देखील नातं आहे.

सांगायचं झालं तर, अरहान खान याने मदर्स डेच्या दिवशी मलायका हिच्यासोबत लहानपणीचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला. शिवाय दोघांचे काही Whatsapp chat देखील पोस्ट केले. Whatsapp chat मध्ये अरहान याने मलायका हिली मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. लेकाने शुभेच्छा दिल्यानंतर अभिनेत्रीने आभार मानले आणि माझ्यासाठी गिफ्ट काय घेतलं असं विचारलं.

यावर अरहान म्हणाला, ‘मी तुझे कपडे विकले आहेत.’ पुढे मलायका म्हणते, ‘ठिक आहे… कपडे विकल्यानंतर आलेल्या पैशातून मला गिफ्ट आण…’, यावर अरहान म्हणतो, ‘आलेल्या पैशातून तुला गिफ्ट आणतो..’, पुढे अरबाज याचा उल्लेख करत मलायका म्हणते, ‘दोघांमध्ये काहीही फरक नाही…’, मलायका आणि अरहान यांचे Whatsapp chat वाचून चाहते देखूल हसू लागले.

दरम्यान, गेल्या महिन्यात मलायका अरहान खान याच्या ‘डम्ब बिरयानी’ शोमध्ये देखील उपस्थित राहिली होती. तेव्हा देखील दोघांच्या चर्चा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या होत्या. मलायका या शोमध्ये म्हणाली होती, अरहान खान पूर्णपणे त्याच्या वडिलांसारखा आहे आणि कधीकधी ती स्वतः आश्चर्यचकित होते की दोघांमध्ये इतकं साम्य कसं आहे.

मलायका हिने अरहान याच्या शोमध्ये देखील स्वतःच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असणाऱ्या मलायका हिला अनेकदा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. सोशल मीडियावर दोखील मलायका कायम चर्चेत असते.

मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचं फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप