AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora Video : घरात नवी कार आणली, पण मलायकाचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी घेतली शाळा

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा हिने नुकतीच कार विकत घेतली. गाडी रस्त्यावर चालवण्यापूर्वी तिने कारची पूजा केली. मात्र त्यावेळचे तिचे कपडे, तिचा पोशाख आणि पायातल्या चपला, हे बऱ्याच नेटकऱ्यांना ते रुचलं नाही. अनेकांनी तिची शाळा घेतली.

Malaika Arora Video : घरात नवी कार आणली, पण मलायकाचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी घेतली शाळा
नवी कार घेतली, पण नेटकरी मलायकावर भडकलेच..Image Credit source: social media
| Updated on: Aug 05, 2026 | 9:44 AM
Share

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora ) नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या गाण्यांमुळे तर कधी तिच्या फोटोज, व्हिडीओजमुळे… नुकतीच मलायकाने एक चमचमती, आलिशना, नवीकोरी कार विकत घेतली. सोशल मीडियावर तिच्या कारचा व्हिजडीोही समोर आला असून अनेकांनी तिचं अभिनंदन केलं. नवी कार रस्त्यावर चालवून पाहण्यापूर्वी मलायकाने मनोभावे कारची पूजा केली, मात्र तिच्या या व्हिडीओनंतर संमिश्र प्रतिक्रिया येत असून अनेकांनी तिला कपड्यांवरून ट्रोल केलं आहे. गाडीची पूजा करा करताना मलायाकने जे कपडे घातले ते योग्य नव्हेत, असं म्हणत काहींनी तिला सुनावलं. एवढंच नव्हे तर तिच्या पायातल्या चपला पाहूनही नेटीजन्स भडकले असून त्यावरूनही त्यांनी मलायकाची शाळा घेतली आहे. हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला असून अजूनही बऱ्याच कमेंट्स येत आहेत.

मलायकाने खरेदी केली लग्झरी थार रॉक्स

मलायका अरोरच्या घरी नव्या कारचं आगमन झालं. तिने नवीकोरी, आलिशान अशी Mahindra Thar Roxx Star Edition कार विकत घेतली असून ती अत्यंत लग्झरी कारपैकी एक मानली जाते. पिवाळ्या रंगाची मलायकाची ही गाडी असून त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला आहे. रिपोर्ट्नसुार या गाडीची एक्स-शोरूम किंमत 16.85 लाख रुपये आहे.

नवी गाडी विकत घेऊन ती घरी आणल्यानंतर मलायकाने पारंपारिक पद्धतीने कारची पूजा केली. व्हायरल झालेल्या व्हिडीओत मलायका भक्तिभावाने गाडीची पूजा करताना दिसते. अनेकांना बॉलिवूडच्या या स्टारचा हा अंदाज आवडला असला तरी काही लोकांना मात्र तिचे कपडे, तिचा पोशाख बिलकूल आवडला नाही. एवढंच नव्हे तर चप्पल घालून पूजा केल्याबद्दल काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केली.

कपडे आणि चपलांवरून सुनावलं

गाडीची पूजा करताना त्या शोरूममधील मेंबर्स आणि इतर स्टाफही तिथे होता.यावेळी मलायकाने लाइट ब्लू -व्हाईट केप्री आणि स्लीव्हलेस टॉप घातला होता. मात्र तेव्हा तिच्या पायात चपलाही होत्या,अनेकांना ते रुचलं नाही. चप्पल घालून कोण पूजा करतं ? असा सवाल एका युजरने विचारला. तर, अर्धवट कपडे आणि पायात चपला, अशा पेहरावात गाडीची पूजा कशी करतात? असा सवाल आणखी एकाने विचारत मलायकावर टीका केली. तिचे असे कपडे घालणंही अनेकांनाआवडलं नसून त्यावरूनही नेटकऱ्यांनी तिला सुनावलं आहे.

मलायकाचं कार कलेक्शन

52 वर्षांची मलायका अतिशय आलिशान आयुष्य जगते. तिच्याकडे बऱ्याच कार असून त्यामध्ये Range Rover LWB Autobiography, ऑडी Q7, BMW 7 Series 730Ld DPE Signature आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टा अशा वाहनांचा समावेश आहे. चित्रपटातील आयटम साँग्स आणि टीव्ही रिअॅलिटी शो व्यतिरिक्त ती ब्रँड एंडोर्समेंटमधूनही बक्कळ कमाई करते. IMDb च्या रिपोर्टनुसार, तिचं नेटवर्थ 100 कोटींच्यी आसपास आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल