Malaika Arora हिचं लक्षवेधी वक्तव्य… म्हणाली, पुरुष अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न करतात आणि…
Malaika Arora on Personal Life : अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट, खोचक विधान करत मलायका म्हणाली, पुरुष अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न करतात आणि..., सध्या सर्वत्र फक्त मलायका अरोरा हिची चर्चा...

Malaika Arora on Personal Life : अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते… सर्वात महत्त्वाचं म्हणजे मलायका तिच्या रिलेशनशिपमुळे अधिक चर्चेत असते. एवढंच नाही तर, अभिनेत्री स्वतःच्या खसागी आयुष्यावर ठाम मत मांडताना देखील दिसते. वयाच्या 50 व्या वर्षी स्वतःच्या अटींवर जगणाऱ्या मलायका हिने आता देखील स्वतःच्या खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. रिलेशनशिपमुळे मलायका हिला अनेकदा ट्रोल देखील केलं जातं… अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मलायका हिने मोठं वक्तव्य केलं आहे.
बरखा दत्त यांच्यासोबत साधलेल्या संवादात मलायका अरोरा हिने महिला आणि पुरुषांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘खंबीर आणि स्वतःच्या अटींवर जगत असल्यामुळे तुम्हाला कायमच जज केलं जातं… माझ्या आयुष्यात देखील काही पुरुष आले… त्यामधील काही खरंच प्रचंड प्रेरणादायी होते… त्यामुळे पुरुषांबद्दल मला सन्मान आहे…’
पुरुष आणि महिलांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल आणि नियमांबद्दल देखील मलायका हिने मोठं वक्तव्य केलं आहे. मलायका म्हणाली, ‘पुरुष त्याच्या आयुष्यात पुढे जात असेल… त्याचे निर्यण घेत असेल. घटस्फोट घेतल असेल… त्यानंतर अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न करत असेल तर लोकं त्याचं कौतुक करतात… पण हेच जर महिलांनी केलं तर, तिला अनेक प्रश्न विचारले जातात… ‘ती असं का करतेय…’ असं देखील मलायका म्हणाली…
मलायका हिला काय सांगायची आई…
आईने सांगितलेल्या सल्ला आठवत मलायका म्हणाली, ‘मला माझी आई कायम सांगायची, ज्या मुलाला पहिल्यांदा डेट करशील त्या मुलासोबत बिलकूल लग्न करु नकोस आणि मी तेच केलं. ज्याला पहिल्यांदा डेट केलं. त्याच्यासोबतच लग्न केलं… आईने कायम आम्हाला जीवन जगण्यासाठी शिकवलं आहे…’ असं देखील मलायका म्हणाली.
मलायका हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने वयाच्या 22 व्या वर्षी अभिनेता अरबाज खान याच्यासोबत लग्न केलं. अरबाज आणि मलायका यांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नाच्या जवळपास 19 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला… 2017 मध्ये मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या 6 वर्षांनंतर अरबाज याने शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं. दोघांमध्ये लग्नाचं अंतर देखील मोठं आहे. तर नुकताच शुरा हिने मुलीला जन्म दिला आहे.
