आधी घटस्फोट, नंतर ब्रेकअप…. मलायकाने अखेर मौन सोडलं; अशी पोस्ट शेअर केली की…
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. मलायका अरोरा ही सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय दिसते.

मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतात. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यापासून मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे लवकरच लग्न बंधनात अडकतील असेही सांगितले जात होते. काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे दिसले. अर्जुन कपूर याने मलायका अरोरा हिचे काही खास फोटो देखील शेअर केले.
काही दिवसांपूर्वीच शुरा खान हिच्यासोबत अरबाज खान याने लग्न केले. अरबाज खान याच्या लग्नाची जोरदार चर्चा असतानाच मलायका अरोरा हिचे देखील नाव पुढे आले. अरबाज खान याचे लग्न झाल्यानंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याचे सतत सांगितले जाते. खरोखरच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाले का हे प्रश्न चाहते विचारत आहेत.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांवर अजिबातच भाष्य केले नाही. नुकताच आता मलायका अरोरा हिने ब्रेकअपच्या चर्चांवर माैन सोडल्याचे बघायला मिळतंय. नुकताच मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यानंतर अनेक चर्चा या रंगताना दिसत आहेत. ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

मलायका अरोरा हिने एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ एका पार्टीमधील दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर हा डिजे बनलेला दिसतोय. यावेळी मलायका अरोरा ही देखील या पार्टीमध्ये धमाल करताना दिसत आहेत. मलायका अरोरा हिने शेअर केलेला हा व्हिडीओ बरेच काही सांगून जाताना दिसत आहे. यावरून हे स्पष्ट होतंय की, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाले नाहीये.
मध्यंतरी एक चर्चा होती की, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाले. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाले. यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. एकीकडे अर्जुन कपूर याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपच्या चर्चा आणि दुसरीकडे अरबाज खान याचे झालेले लग्न यामुळे मलायका चर्चेत होती.
