अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नाला 7 महिने पूर्ण, मलायकाने का घेतला असा निर्णय?
Malaika Arora and Arbaaz Khan: शूरा खान हिच्यासोबत अरबाज खानचं दुसरं लग्न, लग्नाच्या 7 महिन्यानंतर मलायका हिला काय झालं, अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरबाज खान - मलायका अरोरा यांच्या नात्याची चर्चा...

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अभिनेता अरबाज खान याला घटस्फोट दिल्यानंतर मलायका तुफान चर्चेत आली. आता पुन्हा मलायका पहिला पती अरबाज खान याच्यामुळे चर्चेत आली आहे. मलायका हिने अरबाज खान याला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आहे. दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अरबाज – मलायका यांचा घटस्फोट 2017 मध्ये झाला. पण मुलगा अरहान याच्यासाठी अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. घटस्फोटानंतर देखील दोघे इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत होते. पण अरबाज याच्या वाढदिवशी मलायकाने पहिल्या पतीला अनफॉलो केलं आहे.
रिपोर्टनुसार, मलायका अरोरा हिचा पहिला पती अरबाज खान याने गेल्या वर्षी शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं. पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर देखील दोघे इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत होते. पण अरबाज याचं दुसरं लग्न झाल्यानंतर दोघांना कधीच एकत्र स्पॉट करण्यात आलं नाही. दरम्यान, शूरा हिने पती अरबाज याला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर मलायकाने अरबाज याला अनफॉलो करण्याची चर्चा जोर धरु लागली. मलायका – अरबाज दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत नसल्याची माहिती समोर येत आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, शूरा हिने अरबाजला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पण यावर मलायका आणि अरबाज यांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. 4 ऑगस्ट रोजी अरबाज याने 57 वा वाढदिवस साजरा केला. तेव्हा शूरा हिने अरबाजसोबत एक डान्सचा व्हिडीओ शेअर करत पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
अरबाज आणि शूरा यांनी गेल्या वर्षी काही खास पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. लग्नानतंर दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. शूरा – अरबाज कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.
View this post on Instagram
मलायका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अरबाज खान याला घटस्फोट दिल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. 2017 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर, मलायका – अर्जुन यांनी 2019 मध्ये प्रेमाची कबुली दिली. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. मलायका – अर्जुन यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांनी कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही.
