राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अभिनेत्रीकडून संविधानाची प्रस्तावना शेअर; नेटकरी म्हणाले..”आपली मंदिरं..”

एकीकडे देशभरात अयोध्येतील राम मंदिरात पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता पहायला मिळाली. तर दुसरीकडे अभिनेत्री पार्वतीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी सोशल मीडियावर भारतीय संविधानाची प्रस्तावना शेअर केली. यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अभिनेत्रीकडून संविधानाची प्रस्तावना शेअर; नेटकरी म्हणाले..आपली मंदिरं..
मल्याळम अभिनेत्री पार्वतीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 12:07 PM

मुंबई : 23 जानेवारी 2024 | सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्यावर प्राणप्रतिष्ठा विधी पार पडली. या सोहळ्यासाठी राजकारणी, चित्रपट उद्याोगातील दिग्गज, अनेक ज्येष्ठ साहित्यिक, उद्याोजक, खेळाडू यांच्यासह विविध पंथांचे शेकडो साधुसंत असे सुमारे आठ हजार निमंत्रित उपस्थित होते. अशातच एका दाक्षिणात्य अभिनेत्रीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. मल्याळम चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव पार्वती थिरुवोथु असं आहे. पार्वतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भारतीय संविधाची प्रस्तावना शेअर केली आहे.

एकीकडे देश आणि जगभरात राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची उत्सुकता पहायला मिळाली. तर दुसरीकडे पार्वतीने लोकांना देशाच्या संविधानाची आठवण करून दिली. पार्वतीने तिच्या या पोस्टमध्ये ‘सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक’ यावर अधिक जोर दिला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘आपला भारत’ असं लिहिलं आहे. पार्वतीने तिच्या पोस्टमध्ये कुठेच प्रभू श्रीराम किंवा राम मंदिराचा उल्लेख केला नाही. मात्र संविधानाच्या प्रस्तावनेचा फोटो शेअर करत तिने रामभक्तांवर निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे. यावरूनच अनेकांनी तिला सवाल केला आहे.

हे सुद्धा वाचा

‘तर मग पार्वती, त्यांना आपली मंदिरं तोडण्याची परवानगी देऊ आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्यावर कायमचा शिक्का मारू? अशा धर्मनिरपेक्षतेला आम्ही फॉलो करत नाही’, असं एकाने म्हटलंय. तर ‘अखेर एका सेलिब्रिटीने तोंड उघडण्याची हिंमत केल्याचं पाहून खूप अभिमान वाटतोय’, असं म्हणत दुसऱ्या युजरने तिची बाजू घेतली. ‘काही लोक खूप उदास आणि रिकामटेकडी असतात. आनंदही साजरा करू शकत नाही’, अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

केवळ पार्वतीच नाही तर मल्याळम चित्रपटसृष्टीतील इतरही काही कलाकारांनी सोशल मीडियावर भारताच्या संविधानाची प्रस्तावना शेअर केली आहे. यामध्ये दिग्दर्शक आशिक अबू, निर्माते जो बेबी, कनी कुसृती, अभिनेत्री आणि डान्सर रिमा कलिंगल, अभिनेत्री दिव्या प्रभा यांचा समावेश आहे.

श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘सियावर रामचंद्र की जय’ या घोषणेनं केली. “आज अनेक पिढ्यांच्या प्रतीक्षेनंतर राम आला आहे. आमचा रामलल्ला यापुढे तंबूमध्ये राहणार नाही, तर भव्य मंदिरात राहील. आमच्या प्रयत्नांमध्ये कमतरता राहिल्यामुळे याला एवढा मोठा काळ लागल्याबद्दल मी रामाची माफी मागतो. मात्र आता ती कमतरता दूर झाली आहे. त्यामुळे रामचंद्र आपल्याला माफ करतील याची खात्री आहे”, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.