Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्रग्ज केस, अंडरवर्ल्ड कनेक्शन, टॉपलेस फोटोशूट.. 25 वर्षांनंतर महाकुंभसाठी भारतात परतली वादग्रस्त अभिनेत्री

2016 मध्ये या अभिनेत्रीला तिच्या कथित पतीसह केन्या विमानतळावर ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती. या अभिनेत्रीचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे.

ड्रग्ज केस, अंडरवर्ल्ड कनेक्शन, टॉपलेस फोटोशूट.. 25 वर्षांनंतर महाकुंभसाठी भारतात परतली वादग्रस्त अभिनेत्री
25 वर्षांनंतर महाकुंभसाठी भारतात परतली वादग्रस्त अभिनेत्री Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 12:56 PM

बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा बऱ्याच अभिनेत्री आल्या, ज्यांनी खूप नाव कमावलं आणि अचानक त्यांनी इंडस्ट्रीला रामराम केला. या यादीत अभिनेत्री ममता कुलकर्णीचंही नाव आहे. तिने ‘तिरंगा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर ती ‘करण अर्जुन’, ‘सबसे बडा खिलाडी’ आणि ‘बाजी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली. करिअरच्या शिखरावर असताना तिने इंडस्ट्री अचानक सोडली. तिचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन जोडल्यानंतर स्टारडम हळूहळू कमी होऊ लागलं होतं. आता बऱ्याच दिवसांनंतर ती तिच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये ममताने असा दावा केला आहे की ती 25 वर्षांनंतर भारतात परतली आहे.

ममता कुलकर्णीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती भारतात परत आल्यानंतर भावना व्यक्त करताना दिसतेय. यावेळी ममता भावूकसुद्धा झाली होती. “मी 25 वर्षांनंतर भारतात परतली आहे. 2000 पासून मी भारताबाहेर राहतेय. हा संपूर्ण प्रवास खूपच भावूक होता आणि आता 2024 मध्ये मी पुन्हा मायदेशी परतली आहे. मला खूप आनंद होत आहे. हा आनंद मला शब्दांत मांडता येत नाहीये. मी फ्लाइट लँड होताना विमानातून माझ्या देशाकडे पाहत होती. ते क्षण माझ्यासाठी खूपच खास होते. या मातृभूमीवर पुन्हा पाय ठेवून मी धन्य झाले”, असं ती या व्हिडीओत म्हणतेय. हा व्हिडीओ शेअर करत ममताने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘मी 25 वर्षांनंतर भारतात परतली आहे. 12 वर्षांच्या तपस्येनंतर 2012 मध्ये मी कुंभ मेळ्यात सहभागी झाले होते. त्यानंतर आता ठीक 12 वर्षांनंतर मी महाकुंभसाठी परतली आहे.’

हे सुद्धा वाचा

ममता कुलकर्णी तिच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत होती. 1993 मध्ये अभिनेत्रीने स्टारडस्ट मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. हे मासिकाचे प्रकाशित होताच बर्‍यापैकी खळबळ उडाली होती. यानंतर तिला 15 हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. ममताबद्दल असं नेहमीच म्हटलं जात होतं की, तिने विकी गोस्वामी या अंडरवर्ल्ड ड्रग माफियाशी लग्न केलं. परंतु, अभिनेत्रीने याचा कधी उल्लेख केला नाही आणि नेहमीच ती केवळ एक अफवा असल्याचं म्हटलं गेलं. असं म्हणतात की ममता विकीसोबत 10 वर्षे दुबईत राहत होती. त्याचबरोबर असंही म्हटलं जात होतं की, तिने तिच्या पतीसह मिळून अनेक बेकायदेशीर कामंही केली.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.