अभिनेता भूषण कडूवर दुःखाचा डोंगर, पत्नी कादंबरीचे कोरोनामुळे निधन

कादंबरी कडू 39 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. (Bhushan Kadu's wife Kadambari Dies )

अभिनेता भूषण कडूवर दुःखाचा डोंगर, पत्नी कादंबरीचे कोरोनामुळे निधन
अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे निधन


मुंबई : प्रख्यात मराठी अभिनेता भूषण कडू (Bhushan Kadu) याच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन झाले. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान कादंबरी कडू यांची प्राणज्योत मालवली. कडू कुटुंबीयांसाठी हा मोठा आघात आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभागी झालेल्या भूषण कडूसोबत त्याच्या कुटुंबाची ओळखही प्रेक्षकांना झाली होती. भूषणला प्रकीर्त हा आठ वर्षांचा मुलगा आहे. (Marathi actor Bhushan Kadu’s wife Kadambari Kadu Dies of COVID19)

कादंबरी कडू 39 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले होते. उपचारादरम्यान कादंबरी कडू यांनी अखेरचा श्वास घेतला.

खळखळून हसवणारा अवलिया निशब्द

भूषण कडूने अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. एक डाव भटाचा, श्यामची मम्मी, भुताची शाळा, बत्ती गुल हाऊस फुल, मस्त चाललंय आमचं, टारगेट, दगडाबाईची चाळ यासारख्या कलाकृतींमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आला. कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्यजत्रा यासारख्या विनोदी कार्यक्रमांतून आपल्या खास विनोदी शैलीने भूषणने प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावले.

बिग बॉसच्या घरात कादंबरीचे दर्शन

कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी या रिअॅलिटीच्या पहिल्या सिजनमध्येही भूषणने हजेरी लावली होती. फॅमिली स्पेशल एपिसोडच्या निमित्ताने भूषणची पत्नी कादंबरी आणि मुलाने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. यावेळी बऱ्याच दिवसांनी आपल्या मुलाला पाहताना भूषणच्या अश्रूंचा बांध फुटला होता. बाप-लेकाच्या नात्याची वीण पाहून स्पर्धक आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या होत्या.

अभिनेत्री मेघा धाडेकडूनही शोक व्यक्त

बिग बॉस मराठीची विजेती आणि अभिनेत्री मेघा धाडे हिनेही कादंबरीच्या निधनाचा धक्का बसल्याचे सांगितले. बिग बॉसच्या घरात आमची पहिल्यांदा ओळख झाली. ती अत्यंत कणखर होती. तिचा आत्मविश्वास पाहूनच मी थक्क झाले होते. ती नेहमीच भूषणला पाठिंबा द्यायची. भूषण बिग बॉसच्या घरात असताना तिने बाहेरची परिस्थिती अत्यंत लीलया एकहाती सांभाळली होती, अशा भावना मेघाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’कडे व्यक्त केल्या आहेत. (Bhushan Kadu’s wife Kadambari Dies )

 गीतकार चंद्रशेखर सांडवे यांनीही कादंबरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे

संबंधित बातम्या :

‘तारक मेहता’फेम टप्पूवर दुःखाचा डोंगर, अभिनेता भव्या गांधीच्या वडिलांचे कोरोनाने निधन

कोरोनाने माझा धडधाकट मित्र 15 दिवसात खाल्ला; अभिनेता अमोल धावडेंच्या निधनावर प्रवीण तरडेंची भावूक पोस्ट

(Marathi actor Bhushan Kadu’s wife Kadambari Kadu Dies of COVID19)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI